पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६२] दावीद आणि योनाथान, १४३ आलास काय? मजकडे ये, ह्मणजे मी तुझें मांस आकाशांतील पांखरांस देईन." मग दावींदाने झटले: “तूं तरवार व भाला व ढाल घेऊन मजकडे आलास, परंतु सैन्यांचा परमेश्वर इस्राएलाच्या फौजांचा देव ज्याची नि. दा त्वा केली, त्याच्या नांवाने मी तुजकडे येतो! आज परमेश्वर तुला मा- इया हाती देईल आणि अवघी पृथ्वी जाणेल की इस्राएलांमध्ये देव आहे, आणि हा सर्व समुदाय जाणेल की तरवार व भाला यांकडून परमेश्वर ता- रण करीत नाहीं, कां की लढाई परमेश्वराची आहे.” मग पलिष्टी उठून येत आहे तो दावीद त्वरा करून पलिष्टयाच्या आंगावर धावला, आणि त्याने आपला हात बटव्यांत घालून तेथून गोटा काढून गोफणून मारला, तो पलिष्टयाच्या कपाळावर लागून गुडला आणि तो भूमीवर उपडा पडला. तेव्हां दावीदाच्या हातांत तरवार नव्हती, ह्मणून त्याने पलिष्टयापासीं जा- ऊन त्याची तरवार मेनांतून काढली आणि तिने त्याला ठार मारून त्या- चे डोके कापून टाकले. आणि आपला युद्धवीर मेला हे पाहून पलिष्टी पळाले. तेव्हां इस्राएली माणसांनी त्यांच्या पाठीस लागून त्यांस मारिले. प्रक० 2. दावीद आणि योनाथान. (१ शमु० १८-२०). १. आणि शौलाचा पुत्र योनाथान याचा जीव दावीदाच्या जिवासी जडला. आणि योनाथानानेजसी आपल्या जिवावर तसी त्याजवर प्रीति केली. आणि त्या दोघांनी परस्परांसीं करार केला. आणि पलिष्ट्यांच्या लढाई- पासून माघारे येत असतां इस्राएलाच्या सर्व नगरांतून बायका गात व नाचत हर्ष करून डफ व झांजा वाजवीत शौल राजाला भेटायास निघा- ल्या, आणि बायका गात व वाजवीत एकमेकींस उत्तर देऊन ह्मणाल्याः "शौलाने आपल्या हजारांस मारिले, दावीदाने आपल्या दहा हजारांस मारिलें." ही गोष्ट ऐकून शौल फार रागे भरला आणि त्या दिवसापासून पुढे तो दावीदावर दृष्टि ठेवीत गेला. मग दुसऱ्या दिवसी दुष्ट आत्मा त्याला लागला, आणि दावीद आपल्या हाताने वाजवीत होता, तेव्हां औलाने भाला मारून झटले, मी त्याला मारून भिंतीस लावीन. परंत दावीद त्यासमोरून निसटून गेला. मग शीलाने त्याला आपल्यापासन