पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ दावीद आणि गल्याथ. प्रक० ६१ पाहा, तो गल्याय नामें युद्धवीर निघून पूर्वीप्रमाणे बोलून त्याने इस्राएलाच्या सैन्याची निंदा केली. परंतु सर्व इस्राएली त्याला पाहून पळाले आणि ह्मणाले : "हा जो मनुष्य त्याला तुह्मी पाहिले काय? जो कोणी याला जिवे मारील त्याला राजा फार द्रव्य देऊन आपली कन्या देईल.” तेव्हां दावीदाने झटले: “जो कोणी त्याला मारील त्याला काय मिळेल? तेव्हां अलीयाब नामे त्याचा वडील भाऊ त्यावर रागे भरून बोललाः "तूं इकडे कां आलास? तो लहान कळप रानांत कोणाच्या हाती ठेविला? तुझा गर्व मी जाणतो लढाई पाहायास तूं आला आहेस." या २. आणि जे शब्द दावीद बोलला ते कित्येकांनी शौलाला सांगित- ले; तेव्हां त्याने त्याला बोलाविले. आणि दावीद शौलाला ह्मणालाः " त्याजमुळे कोणाचे हृदय खचू नये; तुझा दास जाऊन या पलिष्टयासी लढेल." तेव्हां शौल ह्मणाला : “यासी लढायास तूं शक्तिमान नाहीस कां की तूं तरुण आहेस, तो तर तरुणपणापासून लढाईचा मनुष्य आहे." तेव्हां दावीद ह्मणालाः "तुझा दास आपल्या बापाची मेढरे राखीत होता तेव्हां एक सिंह व एक अस्वल येऊन कळपांतून कोकरूं घेऊन गेला. आणि म्या त्यामागे जाऊन त्यास मारून ते त्याच्या मुखांतून काढले. ज्या परमेश्वराने सिंह व अस्वल यांच्या पंज्यां- तून मला सोडविलें तो या पलिष्टयाच्या हातांतून मला सोडवील." मग शौल बोललाः "जा, परमेश्वर तुजसंगती असो!" तेव्हां शौलाने आपली शस्त्रे दावीदावर घातली, त्याच्या डोकीवर पितळी टोप घातला आणि त्या- जवर चिलखत घातले, मग दावीद आपली तरवार कंबरेस बांधून चालू लागला. परंतु त्याने झटले: “यांसुद्धा माझ्याने चालवत नाहीं, कां की यांची पारख म्या केली नाही." तेव्हां तीं दावीदाने आपल्या अंगांतून काढून ठेविली. मग त्याने आपली काठी आपल्या हाती घेऊन ओहळां- तून पांच गुळगुळीत गोटे निवडून घेऊन ते आपल्या मेंढपाळच्या बट- व्यांत ठेवले आणि आपली गोफण हातात घेऊन तो पलिष्ट्याजवळ जाऊ लागला. ३. आणि पलिष्टयाने दृष्टि लावून दावीदाला पाहिले, तेव्हां तो त्याला तुच्छ मानून बोललाः "मी कुत्रा आहे ह्मणून तूं काठी घेऊन मजकडे