पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४१ प्रक० ६१] दावीद आणि गल्याथ. रूपाकडे पाहातो, परंतु परमेश्वर हृदय पाहातो." मग इशायाने आपले सात पत्र अनुक्रमाने शमुवेलापुढे चालविले. परंतु त्याने झटले: “यांतून परमेश्वराने कोणाला निवडिले नाही." मग त्याला विचारले : "हे तुझे सर्व पुत्र आहेत काय?" इशाय ह्मणालाः "अजून धाकटा राहिला आहे, पाहा, तो मेंढरे राखीत आहे, मग त्याने बोलवायास पाठवून त्याला आणले. तो तर तांबूस, सुंदर व सुरेख होता आणि त्याचे नांव दावीद असें होतें." तेव्हां परमेश्वराने झटले: "उठून याला अभिषेक कर, कां की हाच तो आहे." मग शमुवेलाने त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला. आणि परमेश्वराचा आत्मा शौलास सोडून गेला आणि दुष्ट आत्मा त्यास बाधू लागला. आणि इशायाचा पुत्र वीणा निपुण वाजविणारा आहे असे सम- जून शौलाने दूत पाठवून दावीदाला बोलावून आणले. मग दुष्ट आत्मा शौलावर असतां दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवी, तेव्हां शौल शांत होऊन बरा होई आणि तो दुष्ट आत्मा त्याला सोडून जाई. प्रक०६१. दावीद आणि गल्याथ. (शमु० १७). १. आणि पलिष्टयांनी यहूदासी लढाईस आपले सैन्य एकवट केले, तेव्हां पलिष्टी एका बाजूस डोंगरावर उभे राहिले व इस्राएल दुसऱ्या बा- जूस डोंगरावर उभे राहिले व त्यांच्यामध्ये खोरे होते. आणि गथांतील गल्याथ नामें एक युद्धवीर पलिष्टयांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची सहा हात व एक वीत होती. त्याच्या डोकीवर पितळी टोप होता व तो खवलाचे चिलखत ल्यालेला होता आणि त्याच्या भाल्याचा दांडा सा- ळ्याच्या तुरीएवढा होता. तो इस्राएलाच्या सैन्यांस हाक मारून बोललाः "तुह्मी आपल्या मधून माणूस निवडा, आणि तो मजपासीं उतरून येवो, त्याच्याने मला जिवे मारवले तर आह्मी तुमचे दास होऊं, परंतु म्या त्याला जिंकून जिवे मारले तर तुझी आमचे दास होऊन आमची चाकरी करा." तेव्हां शौल व सर्व इस्राएल हे शब्द ऐकून फार घाबरले व भ्याले.-- त्या वेळेस दावीद आपल्या बापाची मेंढरें राखायास आपल्या परी परत गेला होता. त्याचे तिघे भाऊ तर लढाईस गेले होते. आणि इशायाने दावीदाला आपल्या भावांचा समाचार घेण्याकरितां सैन्या- कडे पाठविले. तेव्हां दावीद येऊन आपल्या भावांस सलाम करीत असता