पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४. शौलाचा त्याग. दावीदाचा राज्याभिषेक. [प्रक० ६० गुरे यांस राखून में फुसकें नासके होते त्याचा नाश त्यांनी केला. तेव्हां परमे- श्वराने शमुवेलाला झटले: “म्या शौलाला राजा केले यावरून मला अनुताप झाला कां की त्याने माझ्या आज्ञा मोडल्या आहेत." आणि श- मुवेल शौलाला भेटायास गेला, तेव्हां शौलाने त्याला झटले: “परमेश्वर तुझे कल्याण करो! म्या परमेश्वराची आज्ञा मानली आहे." तेव्हां शमुवेल ह्मणालाः “तर मेंढरांचे बेबावणे व गुरांचे हुंबरणे मी ऐकतो हे कोठून आहे ?" शौल ह्मणाला : “लोकांनी मेंढरे व गुरे यांतली उत्तम तुझा देव परमेश्वर याजवळ यज्ञ करायासाठी राखली. वरकडांचा नाश आह्मी केला आहे." मग शमुवेल ह्मणालाः "तूं आपल्या हिशेबांत हलका हो- तास, तेव्हां तूं इस्राएलाच्या वंशांचा मुख्य झाला नाहीस काय? परमेश्व- राला आपले वचन मानण्याने जितका संतोष असतो तितका होमांनी व यज्ञांनी याला होईल काय? पाहा, यज्ञापेक्षां मानणे बरे आहे.अवज्ञा गारुडा- च्या पापासारखी आहे आणि हट्ट हा अन्याय व मूर्तिपूजा यांसारखा आहे, खा परमेश्वराची आज्ञा धिक्कारली, यामुळे राज्य करण्यापासून त्याने तुला धिक्कारले आहे." आणि शमुवेल जायास मुरडला तेव्हां शौलाने त्याच्या झग्याचा कांठ धरला व तो फाटला. तेव्हां शमुवेलाने त्याला मटले : "परमेश्वराने आज इस्राएलाचे राज्य तुजपासून फाडून घेऊन तुझा शे- जारी जो तुजपेक्षां बरा त्याला दिले आहे." यानंतर शमुवेल जाऊन आप. ल्या मरण दिवसापर्यंत शौलाला भेटायास अणखी गेला नाही. तथापि शमुवेलाने शौलासाठी शोक केला. ____२. आणि परमेश्वराने शमुवेलाला झटले: “म्या शौलाला धिक्कारले आहे, तर तूं किती काळ त्यासाठी शोक करसील? आपल्या शिंगांत तेल भरून चल आणि इशाय बेथलहेमी याकडे जा. कांकी त्याच्या पुत्रांमध्ये म्या राजा पाहिला आहे." आणि शमुवेल बेथलहेमास पोहचल्यावर त्याने इशाय व त्यांचे पुत्र यांस पवित्र करून यज्ञाला बोलाविले. मग ते आ- ल्यावर त्याने वडील पुत्राला पाहून आपल्या मनांत झटले: खचीत हा परमेश्वरासमोर अभिषिक्त आहे. परंतु परमेश्वर शमुवेलाला ह्मणाला: "त्याच्या रूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहूं नको, कां का म्या त्याला नाकारिले आहे. जसे मनुष्य पाहातो तसे नाही, कां की मनुष्य