पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ६०] शौलाचा त्याग. दावीदाचा राज्याभिषेक. १३९ अभिषिक्तासमोर मजवर साक्ष द्या." तेव्हां त्यांनी झटले“त्वा असे काही केले नाही ह्मणून परमेश्वर साक्षी आहे." मग शमुवेल लोकांस ह्मणालाः "तुह्मी मला मटले, आह्मावर राजा राज्य करो, आणि तुमचा देव परमे- श्वर तोच तुमचा राजा होता. तर आतां पाहा, परमेश्वराने तुह्मावर राजा ठेवला आहे, तर केवळ परमेश्वराला भिऊन खरेपणाने आपल्या सं- पूर्ण मनाने त्याला माना. परंतु जर दुष्टाई तुह्मी कराल तर आपल्या रा- जासुद्धा तुह्मी नाश पावाल. तर आतां राहून जो मोठा उत्पात परमे- श्वर तुमच्या दृष्टीसमोर करील तो पाहा. आणि राजा मागण्याने तुह्मी किती मोठा अपराध केला तो समजा." त्या वेळेस गव्हांची कापणी *) होती, आणि शमुवेलाने परमेश्वराला हाक मारली, तेव्हां परमेश्वराने ग- जना व वृष्टि केली, ह्मणून सर्व लोकांस फार भय पडून त्यांनी शमुवेलाला हटले: “आह्मी मरूं नये ह्मणून परमेश्वरापासी आपल्या सेवकांसाठी विनं- ती कर." मग शमुवेलाने मटले: "भिऊ नका! हे सर्व दुष्कर्म तुह्मो केले खरे, तथापि परमेश्वर आपल्या मोठ्या नामाकरितां आपले लोक टाक- णार नाही. आणि मी तुह्मासाठी परमेश्वरापासीं प्रार्थना करायास सो- डणे हे पाप मजकडून न घडावे, तर जो मार्ग चांगला व खरा तो मी तुह्मास शिकवीन"t).

  • * ) गव्हाच्या कापणीसमयीं (एग्रोल, मे.) खनान देशात पाउस पडला किंवा ग-

जना झाली असें कोणाच्या ऐकण्यांत सुद्धा कधी झाले नव्हते. + ) शमुवेलाने न्यायाधिशाचे काम मात्र सोडून दिले, परंतु भविष्यवाद्याचे काम तो तसेच करीत गेला. प्रक० ६०. शौलाचा त्याग. दावीदाचा राज्याभिषेक. (१ शमु० १५ व १६.) १. आणि शमुवेल शौलाला ह्मणालाः “परमेश्वर असे ह्मणतो की इस्राएल मिसरांतून येत असतां (प्रक०३३ क ०३) अमालेकांनी वाटेवर दबा रून त्यांसी जे केले त्याची शिक्षा मी त्यांस लावीन. आतां तूं जाऊन गालेकांस मार व त्यांच्या अवध्यांचा विनाश कर. तेव्हां शौलाने जाऊन अमालेकांस मारिले. परंतु त्यांचा राजा अगाग शिवाय उत्तम मेंढरे व