पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ शौल राजा होतो. [प्रक० ५९ "पाहा, माझ्या लोकांवर अधिकार करील तो हाच आहे." मग शमुवेलाने शौलाला मटले: “आज तूं मजसंगतीं जेव, आणि तुझीं जी गाढवे त्यांची काळजी करूं नको, कां की ती सांपडली आहेत; आणि इस्राएलाची सर्व इच्छा कोणाकडे आहे ? तुजकडे व तुझ्या बापाच्या सर्व घराण्याकडे की नाही?" मग दुसऱ्या दिवसी सकाळी शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या डोकीवर ओतली आणि त्याचे चुंबन घेऊन झटले: “परमे- श्वराने तुला आपल्या लोकांवर अधिकारी आभिषेकिलें आहे." मग तो शमुवेलापासून जायास फिरल्यावर देवाने त्याला नवी बुद्धि दिली. ३. आणि शमुवेलाने लोकांस बोलावून मिसपेस परमेश्वराजवळ इस्ला- एलाचे सर्व वंश व त्यांतील घराणी यांवर पण टाकल्यावर कीशाचा पुत्र शौल निघाला. तेव्हां त्यांनी त्याचा शोध केला, आणि पाहा, तो खट. ल्यामध्ये लपला आहे असा सांपडला. मग सर्व लोक धांवत जाऊन मोठ्या शब्दाने बोलले: “राजा वांचो.” परंतु कियेक दुष्ट माणसे बोलली: “हा आमास कसा तारील?" असे बोलून त्यांनी त्याची निंदा केली तथापि तो उगाच राहिला. आणि अम्मोनी राजा नाहाश याने याबेश गिलादास वेढा घालून “मी तुह्मांतील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडीन," असे त्यांस बोल- ला. तेव्हां याबेशांतील जासुदांनी येऊन या गोष्टी सांगितल्या, तेव्हां अवघे लोक हेल काढून रडले. इतक्यांत शौल रानांतून ढोरांमागे आला, तेव्हां त्यांनी त्याला वर्तमान सांगितले. मग देवाच्या आल्याने प्रेरिला असतां स्याने इस्राएलाच्या सर्व प्रांतांत युद्धास येण्याविषयी निरोप पाठविला. तेव्हां परमेश्वराचे भय लोकांस पडले आणि एकाच माणसासारखे चढून त्यांनी अम्मोन्यांस जिवे मारले. मग लोक शमुवेलाला ह्मणाले: “'शील आह्मावर अधिकार करील काय?' असे जे बोलले ते कोण आहेत. ती माणसे का ढन दे ह्मणजे आमी त्यांस जिवे मारूं.' परंतु शौल बोललाः “आज को- णी एकाही माणसाला जिवे मारायाचे नाहीं, कां की आज परमेश्वराने इस्राएलांत तारण केले आहे." ४. आणि शमुवेलाने लोकांपासून निरोप घेतला आणि ह्मणालाः "पाहा, मी एथे आहे. म्या कोणावर बलात्कार केला किंवा कोणाला फस- विले किंवा कोणाच्या हातून लांच घेतला, तर परमेश्वरासमोर व त्याच्या