पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५९ शौल राजा होतो. त्यांचा मोड झाला. तेव्हां शमुवेलाने धोंडा घेऊन उभा केला आणि त्याला एबनेजर (सहायाचा धोडा) असे नांव ठेवून मदले: “एथपर्यंत परमेश्वराने आमचे सहाय केले आहे." असे पलिष्टी पराभूत होऊन इस्खा- एलाच्या सीमेत आणखी आले नाहीत. GENERAऊन इस सार्वजनि पांचवा भाग. राजे यांचा इतिहास प्रक०४२. शौल राजा होतो. (१शमु०८ –१४.) १. आणि शमुवेल मातारा झाल्यावर त्याने आपले पुत्र इस्राएलावर न्यायाधीश करून ठेवले. परंतु त्याच्या मार्गात त्याचे पुत्र चालत नसत, तर लाभाकडे वळून लांच खाऊन न्याय विपरीत करीत असत. मग सर्व वडील मिळून शमुवेलाकडे येऊन त्याला ह्मणाले : "पाहा, तूं मातारा झालास, आणि तुझे पुत्र तुझ्या मार्गात चालत नाहीत. आतां सर्व राष्ट्रांप्रमाणे आम- चा न्याय करील व आमच्या लढाया करायास आमच्यापुढे चालेल असा आह्मावर राजा नेमून ठेव." त्या वेळेस तर अम्मोनी लोकांचा राजा नाहाश इस्राएलांसी युद्ध करायास आला होता. आणि ही जी गोष्ट त्यांनी सांगि- तली ती शमुवेलाला वाईट वाटली, पण परमेश्वर त्याला ह्मणाला : "लो- कांची जी विनंती ती सर्व ऐक ; त्यांनी तुला नाकारिले नाही, तर म्या त्यांजवर राज्य करूं नये ह्मणून त्यांनी मला नाकारिले आहे." . २. आणि बन्यामिनांतील कांश नामें एक माणस होता. त्याचा शोल नाम पुत्र तरुण व सुंदर होता, त्याच्या खांद्यास सर्व लोक लागत इतका तो उंच होता. आणि कीश याची गाढवे बहकलीं, ह्मणून शौल गाढवांच्या गोधास गेला आणि त्यांचा शोध करीत करीत आपण कोणत्या वाटेने फिरावे हे विचारायास ज्या नगरांत देवाचा माणूस शमुवेल. राहत होता तेथे गेला. तेव्हां शमुवेल शौलाला पाहत असतां परमेश्वर त्याला ह्मणाला : 18 II