पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ ____एली आणि शमुवेल. [प्रक० ५८ कोशापुढे भूमीवर पालथा पडला आहे. तेव्हां त्यांनी तो घेऊन त्याच्या ठिकाणी परत ठेवला. परंतु पुढील दिवसी पाहटेस तो पुन्हा भूभीवर पालथा पडला आहे आणि त्याचे डोके व त्याच्या हातांचे दोन्ही पंजे उंबऱ्या- वर तोडून पडले आहेत*) असे त्यांस आढळले. आणि परमेश्वराचा हात पलिष्टयांवर भारी झाला व त्याने त्यांस भारी पीडा केली. तेव्हां देवा- चा कोश सोन्याच्या दोषार्पणासुद्धां इस्राएलाकडे परत पाठवावा असा त्यांनी निश्चय केला.परंतु परमेश्वराच्या हातापासून हे आह्माला झाले आहे, किंवा दैवाने आह्मावर पडले, हे समजण्याकरितां त्यांनी नवी गाडी करून कोश त्याजवर ठेवला आणि दोन तरुण दुभत्या गायी गाडीला जुंपल्या व त्यांची वासरे वेगळी करून गोठ्यांत ठेवली. तेव्हां गायी नीट वाट धरून इस्राएलाच्या सीमेतील बेथशमशाकडे गेल्या. मग तेथील ले- व्यांनी परमेश्वराचा कोश उतरून घेऊन गाडीचे लाकूड तोडून गायीं- चा यज्ञ केला. आणि बेथशमशांतील माणसां पैकी कित्येकांनी परमेश्वरा- च्या कोशांत पाहिले ) ह्मणून ती मारली गेली. त्यानंतर त्यांनी कोश गीब्यांत नेऊन अबीनादाब जो याजक याच्या घरांत ठेविला.

  • ) पलिष्टयांची दागोन नामें मूर्ति होती, तिचे डोके व हात माणसाने आणि धड

माश्याचे होते. हिंदु लोकांच्या मत्स्यावताराच्या मूर्तीसारखी ती मूर्ति होती. +) प्रमुख याजक यांनी मात्र वर्षांत एकवेळ पापापणाचे रक्त घेऊन काशाकडे जाय (प्रक०४.क. ३). याजकांस देखील आंत जाण्याची मनाई होती (गण०, २०) "याजकांनी पवित्र वस्तू पाहायास जवळ येऊ नये, आले तर मरतील.' ६. आणि शमुवेलाने अवध्या इस्राएलांच्या लोकांस मटले: “जर तुह्मी आपल्या सर्व मनाने परमेश्वराकडे फिरतां तर आपणांपासून अन्य देव दूर करा आणि आपली अंत:करणे परमेश्वराकडे लावून केवळ त्याची सेवा करा, ह्मणजे तो तुह्मास पलिष्टयांच्या हातांतून सोडवील." तेव्हां त्यांनी सर्व अन्य देवांस दूर करून केवळ परमेश्वराची सेवा केली. मग शमुवेलाने सर्व इस्राएलांस मिसपेत एकवट करून त्यांच्यासाठी पर- मेश्वराचा धावा केला आणि परमेश्वराने त्याचे ऐकिले. ह्मणजे शमुवल यज्ञ करीत असतां पलिष्टी इस्राएलांसी लढायास जवळ आले, त्या वळस परमेश्वराने मोठ्या गर्जना करून त्यांस घाबरे केले व इखाएलांच्या पुढे