पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३५ प्रक० ५८] एली आणि शमुवेल. सऱ्या वेळेस तर एलीला समजले की, परमेश्वराने पोराला हाक मार- ली असेल. ह्मणून एली शमुवेलाला ह्मणालाः "जर तो तुला हाक मा- रील तर असे ह्मण, हे परमेश्वरा, बोल, कांकी तुझा सेवक ऐकत आहे." तेव्हां शमुवेल जाऊन आपल्या ठिकाणी निजला. मग परमेश्वर पूर्वी प्रमाणे 'शमुवेला, शमुवेला" असी हाक मारली. तेव्हां शमुवेल ह्मणा- लाः "बोल हे प्रभू, कांकी तुझा सेवक ऐकत आहे." तेव्हां परमेश्वराने सां- गितले की: “पाहा, जे मी एलीच्या कुटुंबाविषयीं सांगितले ते सर्व मी करीन. कांकी त्याच्या पुत्रांनी आपणांस फार निंद्य केले, तरी त्याने त्यांस दबावले नाही." मग सकाळी हा साक्षात्कार एलीला सांगायास शमुवेल भ्या- ला. तेव्हां एलीने त्याला हाक मारून मटले की: “जी गोष्ट त्याने तुला सांगितली ती काय आहे? ती मजपुढे गुप्त ठेवू नको." तेव्हां शमुवेलाने सर्व गोष्टी त्याला सांगितल्या, मग एली ह्मणालाः “परमेश्वर आहे त्याला बरें वाटेल ते तो करो!" आणि शमुवेल वाढत गेला आणि परमेश्वर त्यासं- गतीं होता आणि त्याच्या सर्व गोष्टींतून कांहीं खाली पडू दिले नाही. तेव्हां शमुवेल परमेश्वराचा नेमलेला भविष्यवादी आहे असे इस्राएलांनी जाणले. ____४. नंतर इस्राएली पलिष्टयांसी लढाईस जाऊन पराभव पावले. मग इस्राएलाचे वडील ह्मणाले: “कराराचा कोश आह्माकडे आणावा,तोआमाम- ध्ये आला ह्मणजे परमेश्वर आमच्या शत्रूच्या हातून आमचे तारण करील." आणि जेव्हां हफनी व फीनहास कराराचा कोश घेऊन छावणीत आले, तेव्हां सर्व इस्राएली मोठ्या शब्दाने ओरडले, आणि पलिष्टी भय धरून ह्मणा- ले: “देव त्यांच्या छावणीत आला आहे. आमास हायहाय, कांकी या समर्थ देवांच्या हातून आमास कोण सोडवील ? ज्या देवांनी मिसऱ्यांस सर्व पीडांकरून हाणले ते हेच आहेत." परंतु इस्राएलांचा पराभव होऊन परमेश्वराचा कोशही त्यांजपासून घेतला गेला, आणि एलीचे दोघे पुत्र मेले. त्या दिवसी एका माणसाने शिलोस धांवत येऊन एलीला वर्तमान सांगितले. आणि त्याने "देवाचा कोश नेला" असे उच्चारिलें, इतक्यांत एली मागे पडला, आणि तो मातारा व जड माणूस असतां त्याची मान मोडून तो मेला. 4 मग पलिष्ट्यांनी कराराचा कोश घेऊन दागोनाच्या देवळांत नेऊन ठेवला. मग ते दुसऱ्या दिवसी पाहटेस उठून पाहतात तो दागोन