पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ एली आणि शमुवेल. [प्रक० ५८ मी दुःखित मनाची बायको आहे आणि म्या आपला मनोभाव परमेश्वरा- जवळ कळविला आहे.” मग एली तिला ह्मणालाः “सुखरूप जा आणि इस्राएलाचा देव याजपासी जे त्वा मागितले ते तो तुला देवो.” आणि परमेश्वराने तिची अठवण केली, मग ती पुत्र प्रसवली व त्याचे नांव शमुवेल (देवापासून मागितलेला ) असे ठेवले. आणि मुलग्याचे दूध तोडल्यावर ती त्याला एलीकडे आणून ह्मणालीः "माझ्या प्रभू, जी बाय- को परमेश्वराची प्रार्थना करीत एथे तुजजवळ उभी राहिली होती ती मीच आहे, या लेकरासाठी जी विनंती मी परमेश्वरापासीं केली ती त्याने मला पूर्ण करून दिली. ह्मणून तो मी परमेश्वराला देते कारण तो परमेश्वराकडून मागून घेतलेला आहे.” २. एलीचे पुत्र हफ्नी व फीनहास जे शिलोमध्ये याजक होते, ते तर दुष्ट मनुष्य होते, त्यांनी परमेश्वराला जाणले नाही. आणि त्यांनी याजकाची रीत संभाळली नाहीं. एली तर फार मातारा होता आणि आपल्या पुत्रांनी कसकसे केले हे सर्व ऐकून तो त्यांस ह्मणाला : “तुह्मी असे कृत्य कां करितां? माझ्या पुत्रानो, असे नका, जे वर्तमान मी ऐकतों ते बरे नाही." परंतु ते आपल्या बापाचा बोध ऐकेनात.-आणि देवाचा एक माणूस एलीकडे येऊन त्याला ह्मणालाः “परमेश्वर असे ह्मणतो की, तूं माझ्यापेक्षा आपल्या पुत्रांस कां मानितोस? जे मला मानितात त्यांचा मान मी करीन, आणि जे मला अवमानितात ते अवमानित होतील. पाहा, असे दिवस येत आहेत की तुझे दोघे पुत्र एकाच दिवसीं मरतील: आणि मी आपणासाठी विश्वासू याजक उत्पन्न करीन, तो माझ्या अंतःकरणांत जे आहे ते करील." ३. आणि त्या दिवसांमध्ये परमेश्वराचे वचन विरळे होते, कांहीं उ. घड दर्शन नव्हते. त्या वेळेस असे झाले की परमेश्वराच्या मंदिरांत श- मुवेल निजला असतां परमेश्वराने त्याला हाकमारली. मग तो एलीं- कडे धावून ह्मणालाः “मी एथे आहे, कां की त्वा मला बोलाविले." त्याने हटले: “म्या तुला बोलाविले नाही, परत जाऊन निज.” त्यापूर्वी तर शमुवेलाने परमेश्वराला ओळखिले नव्हते, आणि परमेश्वराचे वचन त्याला प्रगट झाले नव्हते. मग परमेश्वराने अणखी दोनदां हाक मारली. ति-