पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५८] एली आणि शमुवेल. १३३ काय?" तो बालला: “मी खंडून घेईन." मग बवाज ह्मणालाः "तूं ते शेत घसील तर मेलेल्याचे नांव त्याच्या वतनावर चालावे ह्मणून रूथ तुला बायको करून घ्यावी लागेल." तेव्हां तो बोलला: "माझ्याने ते खंडून घेववत नाही. तूं ते खंडून घे." मग बवाज बडिलांस ह्मणालाः 'आज तह्मी साक्षी आहां." ते बोलले: “आह्मी साक्षी आहो." आणि ते ह्मणाले: "राहेल व लेआ यांसारखे तुझ्या घरांत जी बायको आली तिलाही परमे- श्वर करो!" या प्रकारे बवाजाने रूथ आपली बायको करून घेतली, आणि ती त्याला पुत्र प्रसवली आणि त्याचे नांव ओबेद ठेवले. ओबेदा- पासून इशाय झाला आणि तो दावीदाचा बाप होय. ४) पुरातन काळापासून इस्राएल लोकांमध्ये असा नेम होता की, जर कोणी निसंतान मरण पावेल तर त्याची विधवा त्याच्या जवळच्या नातलगाने वायको करून घ्यावी. हा त्या नातलगाचा केवळ हक्क होता असे नाही, तर त्याचें तें कर्तव्य होते. अशा लग्न- संबंधाबरून जो प्रथम पुत्र जन्मे तो तिच्या गतवताराचा पुत्र मानून त्याच्या वंशा- वळीत त्याचे नांव लिहीत असत (अनु० २५.५–१० पाहा). प्रक०४८. एली आणि शमुवेल. (१ शमु० १-७). १. एली नामक मुख्य याजक याने इस्राएलांवर ४० वर्षे न्यायधिशी केली. त्याच्या दिवसांत कोणी एक एल्काना नामक माणूस होता आणि त्याच्या बायकोचे नांव हन्ना होते. तिला लेंकरे नव्हती. आणि तो माणूस प्रतिवर्षी परमेश्वराला भजायास व यज्ञ करायास ( सभामंडपाकडे ) शिलोस जात असे. आणि हन्ना त्याबरोबर येई तेव्हां ती खिन्न मनाची असतां फार रडून परमेश्वराजवळ प्रार्थना करी. आणि ती नवस करून बोललीः "हे सैन्याच्या परमेश्वरा, जर तूं आपल्या दासीला पुत्र- संतान देसील तर मी त्याला त्याच्या आयुष्यभर परमेश्वराला देईन आणि वस्तरा त्याच्या डोक्यावर फिरणार नाही." तेव्हां ती आग्रह करून वेळभर परमेश्वराची प्रार्थना करीत असतां एलीने तिच्या तोंडाकडे दृष्टि लावली. उन्ना तर आपल्या मनांत बोलत होती, तिचे ओठ मात्र हालले. ह्मणून ती मटाने मस्त असेल असे एलीला वाटून तो तिला बोललाः "किती काळ तूं मस्त राहसील?" हन्ना उत्तर देऊन बोलली: “असे नाही, माझ्या प्रभ,