पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ रूथ. प्रक० ५७ ती बवाज नामक माणसाच्या शेतांत आली. आणि बवाज आपल्या काप- णाऱ्यांजवळ येऊन त्यांस ह्मणालाः “परमेश्वर तुमच्या संगतीं असो!" आणि "परमेश्वर तुला आशीर्वाद देवो?" असे त्यांनी त्याला उत्तर दिले. मग बबाजाने त्यांस विचारिले: “हीतरणी कोणाची ?" आणि नामी इज- संगती जी मवावीण आली तीच ही आहे असे समजून त्याने तिला झटले: "मुली, ऐकतीस ना? तूं दुसन्या शेतांत वेचायास जाऊं नको एथेच माझ्या चाकरिणी जवळ लगटून राहा. जे शेत कापतात त्यावर तूं या बायकां- च्या मागे चाल, आणि तुला तहान लागली, तर पात्राकडे जाऊन यांतले पी आणि जेवायाच्या वेळेस इकडे येऊन भाकर खा.” तेव्हां ती ह्मणाली: "मी परकी असतां मजवर आपण कृपादृष्टि करून माझा समाचार कसा घेतला. त्याने उत्तर दिले: “तूं आपल्या सासूजवळ कसी वागलीस ते सर्व साद्यंत मला कळले. परमेश्वर तुझ्या कामाची फेड करो, आणि ज्याच्या पंखांचा आश्रय करायाला तूं आलीस त्या परमेश्वरापासून तुला पूर्ण फळ प्राप्त होवो !” आणि बवाजाने "इला पेंढ्यांमध्ये देखील वेचूं द्यावे व तिला लाजवू नका आणि तिला वेचायासाठी कांहीं मुठी टाकीत जा," असी बवाजाने आपल्या गडी माणसांस आज्ञा केली. तसे तिने सांजपर्यंत शेतांत वेचले. ३. मग तिने जे वेचून आणले होते ते तिच्या सासूने पाहून "आज खा कोठे वेचलें!" असे तिला विचारले. ती ह्मणाली: “ज्या माणसाच्या शेतांत आज म्या काम केले त्याचे नांव बवाज आहे." तेव्हां नामीने मट- लेः "साला परमेश्वर आशीर्वाद देवो, तो माणूस आमच्या कुळांतला जव- ळचा नातलग आहे"*). आणि आपल्या सासूने जसजसे सांगितले, त्या- प्रमाणे करून रूयेने खळ्याकडे जाऊन बवाजाला ह्मटले : "आपला पदर आपल्या दासीवर पसरून घाल, कांकीं तूं जवळचा नातलग आहेस." तेव्हां बवाज बोलला: “मी जवळचा नातलग आहे खरा, परंतु मजपेक्षा जवळचा एक नातलग आहे. त्याने तुजविषयीं नातलगाचे काम केले तर बरें, नाही तर, परमेश्वर जिवंत आहे, मी तुजविषयीं नातलगाचे काम करीन!" आणि बवाजाने जाऊन वडील मंडळीसमोर त्या नातलगाला विचारिले : “अलीमलेख याच्या शेताचा भाग तूं खंडून घेणार आहेस