पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५७] रूथ. मिळाली होती तिचा त्याने अयोग्य रीतीने व्यय करून केवळ आपल्या मर्जीप्रमाणे तिचा उपयोग केला. त्याच्या दोषाचे विभागी इखाएल लोकही होते. कारण की ते त्याला पाठ न देतां नेहेमी त्यास एक- टा राहूं देत असत इतकेच केवळ नाहीं, तर एका प्रसंगी त्यांनी त्याला भित्रेपणाने शत्रूच्या देखील हाती दिले. ज्या कामाचा शम्- शोनाने आरंभ केला ते काम शमुवेलाने चालविले आणि दावीदाने सिद्धीस नेले. प्रक०६७. रूथ. १. आणि न्यायाधीश आधिकार करीत होते, तेव्हां देशांत दुष्काळ पडला. ह्मणून बेथलहेमांतला अलीमलेख नामें कोणी माणूस आप- ली नामी नामक बायको व आपले दोघे पुन यांसुद्धां मवाब देशांत प्रवास करायास गेला, आणि तेथे तो मेला. परंतु त्याच्या दोघां पुत्रांनी आप- णांस मवाबी बायका करून घेतल्या; एकीचे नांव अर्पा व दुसरीचे नांव ख्थ. मग दहा वर्षांनी हे दोघेहि मेले. तेव्हां नामी आपल्या सुनांसुद्धां उठन मवाब देशांतून माघारी जायास निघाली, कांतर परमेश्वराने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांस खायास दिले हे तिने किलें होते. तेव्हां वाटेने चालत असतां तिने आपल्या सुनांस ह्मटले; "माझ्या मुलीनो, तुह्मी निघून आपापल्या माहेरी माघारे जा. तुमी मेलेले जे त्यांवर व मजवर दया केली तसी परमेश्वर तुह्मावर करो." तेव्हा त्या आपला गळा काढून रडल्या. मग अर्पा आपल्या सासचा मका घेऊन गेली. परंतु रूथ तिजसी लगटून राहिली. मग तिने हटले: “पाहा, तुझी जावू माघारी गेली आहे. तूंही आपल्या जावेमागे फीर." तेव्हां रूथ बोलली: “जेथें तूं जासील तेथे मी येईन; तुझे लोक ते माझे लोक व तुझा देव तोच माझा देव, मरणावांचून कशानेही माझा तुझा वियोग होणार नाही!" तेव्हां त्या दोघी बेथलहेमास पोहंचत पर्यंत चालल्या. २. त्या बेथलहेमास पोहंचल्या, त्या वेळेस सातूची कापणी लागली होती तेव्हां रूथ कणसें वेचायास शेतांत गेली आणि वेचीत वैचीत