पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५६] शम्शोन. १२९ वाईट केले तरी त्यांपेक्षां निर्दोष होईन." आणि त्याने जाऊन ३०० कोल्हे धरिले, आणि कोलिते घेऊन शेपटाकडे शेपूट फिरवून दोन दोन शेपटां- मध्ये एक एक कोलीत ठेवले. आणि कोलितांस विस्तव लावून त्याने त्यांस पलिष्ट्यांच्या उभ्या पिकांत सोडले, आणि तसेच पिकासुद्धां सुड्या व जैतुनाचे मळे जाळिले. तेव्हां याचे कारण समजून पलिष्ट्यांनी बायकोला व तिच्या बापाला अग्नीने जाळले. परंतु शम्शोन यहूदा प्रांतां- तील एटाम नामें खडकाच्या दन्यांत राहिला. मग पलिष्टयांनी जाऊन यहदांत तळ धरिला. तेव्हां यहूदी माणसे त्याला पलिष्टयांच्या हाती द्यायासाठी त्याला बांधायास त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांस आपणा- ला बांधू दिले. मग तो पोहंचला असे पाहून पलिष्टयांनी त्यावर गर्ज- ना केली. परंतु परमेश्वराच्या आत्म्याने त्याला व्यापले असतां जसे वाखतंतु अग्नीत जळून जातात, तसे त्याच्या बाहूंवरले दोर झाले. आणि त्याला तेथे गाढवाचे ओले जाभाड आढळले, ते घेऊन त्याने हजार माणसें मारिली. ४. नंतर तो गाजांत गेला आणि तेथे तो एका बायकोजवळ जाऊन राहिला. तेव्हां पलिष्टयांनी सारी रात्र नगराच्या वेसीजवळ त्यासाठी दबा धरिला. आणि शम्शोन मध्यरात्री उठून नगराच्या वेसीची कवाडे दोन बाह्यासुद्धां व अडसरांसुद्धां धरून काढली आणि ती घेऊन हेब्रोना- समोरल्या डोंगराच्या शिखरावर नेली. त्यानंतर त्याला कोणी एक बाय- को अवडली, तिचे नांव दलीला होते. तिजकडे पलिष्टयांच्या अधिका- यांनी जाऊन मटले : "त्याचे मोठे बळ कशांत आहे, हे समजण्याकरितां त्याला फूस लाव, मणजे आमी एकएक तुला अकरा अकराशे शेकेल रूपे देऊ." तेव्हां दलीला शमशोनाला ह्मणाली : “तुझे मोठे बळ कशांत आहे हे मला सांग बरे." तेव्हां तो ह्मणाला : “सात कोया रशांनी जर त्यांनी मला बांधतील तर मी अशक्त होऊन दुसऱ्या माणसासार- खा होईन.” नंतर तो झोपेत असतां तिने सात कोऱ्या रशांनी त्याला बांधून मटलेः “शम्शोना, पलिष्टी तुजवर आले आहेत." तेव्हां जसा ता- गाचा दोरा अग्नीला लागतांच तुटून जातो तसे त्याने त्या रशा तोडून टाकल्या. त्याप्रमाणे त्याने तिला तीनदां फसविले. आणि तिने आपल्या बहत बोलण्यांनी त्याला सारा दिवसचाटीत घालून त्यामी असी जिकीर केली की 17 H