पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ शम्शोन. प्रक० ५६ - २. नंतर बायकोला पुत्र झाला आणि तिने त्याचे नांव शमशीन ठेविलें. आणि मूल वाढला आणि परमेश्वराचा आत्मा त्याला प्रेरणा करूं लागला. आणि त्याने तिम्राथांत पलिष्टयांच्या कन्यांतील एक बायको केली, आणि हे परमेश्वराकडून झाले की त्याने पलिष्टयांवर प्रसंग पाहा- वा. तो मागणी करण्याकरिता तिनाथास जात होता, तेव्हां सिंहांतला तरणा सिंह त्याजवर येऊन गर्जला. तेव्हां परमेश्वराच्या आत्म्याने व्या- पला असता त्याने जसे करडूं पाडावे तसे त्याला पाडून टाकिले. मग काही वेळानंतर तो लग्न करायास गेला, तेव्हां सिंहाच्या कलेवरांत मधमाश्यांची झुंड व मध होती. ती त्याने आपल्या हाती घेऊन चाल- तां खात चालला. मग लग्नांत त्यांनी त्याच्या संगतीं राहयास तीस सवं- गडी आणले त्यांस शम्शोन ह्मणाला, मी तुह्मास कोडे घालितो, जेवणा- वळीच्या सात दिवसांत जर तुह्मी ते उगवून मला सांगाल तर मी तुह्मास तीस पासोड्या व वस्त्रांचे तीस जोडे देईन. परंतु तुमच्याने मला न सांगवले तर मी तुह्मापासून ते घेईन. ते त्याला ह्मणाले : "आपले कोडे घाल." तेव्हां तो त्यांस ह्मणाला : “खाणान्यांतून अन्न निघाले आणि बळकटांतून गोडी निघाली.” तेव्हां त्यांच्याने कोडे सांगवले नाहीं, ह्मणून त्यांनी शमशोनाच्या बायकोला झटले: “त्याने ते कोडे आह्मास सांगावे ह्मणून तूं आपल्या नवऱ्याचे मन मानीव, नाही तर आह्मी तुला व तुझ्या बापाच्या घराला आग लावून जाळू." मग शमशोनाची बायको त्यासी रडत बोल- ली: "तूं मजवर प्रीति करीतच नाहींस, त्या माझ्या लोकांतल्या माणसांस कोडे घातले आहे आणि ते मला सांगितले नाही." आणि तिने त्याला फार निकड लावली असता त्याने तिला सांगितले. आणि सातव्या दिव- सी त्य माणसांनी त्याला पटले: “मधेपेक्षां गोड काय आणि सिंहापेक्षा बळकट काय?" तेव्हां तो त्यास बोललाः "तुह्मी माझ्या कालवडीने नांग- रिले नसते, तर माझे कोडें उगविले नसते." आणि त्याचा राग पेटला असतां तो (डोगरवटीत) आपल्या बापाच्या घरी गेला. ३. अणखी काही वेळानंतर गहू कापण्याच्या दिवसांत शम्शोन आ- पल्या बायकोच्या भेटीस गेला, तेव्हा तिचा बाप त्याला बोलला: "खा तिचा अगदी द्वेष केला, असे मला खचीत वाटल्यामुळे म्या ती तुझ्या सख्याला दिली." तेव्हां शम्शोन बोलला : “यावेळेस जरी मी पलिष्टयांसी