पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५६] शमशोन. १२७ निघाले त्याप्रमाणे माझे कर, कां की परमेश्वराने तुझे शत्रु यांचा तुज- साठी प्रतिकार केला आहे." तेव्हां ती आपल्या सोबतिणींसुद्धां जाऊन दोन महिने आपल्या कुमारपणाला रडली. मग ती आपल्या बापाकडे माघारी आली असतां त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. प्रक० १६. शमशोन. (न्याय० १३–१६). १. आणि इस्राएलाच्या वंशांनी परमेश्वराच्या दिसण्यांत फिरून वाईट केले; मग त्याने त्यांस पलिष्टयांच्या हाती ४० वर्षे दिले. तेव्हां परमे- श्वराच्या दूताने दान वंशांतील मानोह याच्या बायकोला दर्शन देऊन सां- गितले की: “तुला पुत्र होईल आणि त्याने द्राक्षरस किंवा दारु पिऊ नये व त्याच्या डोक्यावर वस्तरा न फिरावा, कां की तो देवाचा नाजीर होईल" *) आणि तो इस्राएलाला पलिष्टयांच्या हातांतून सोडवू लागेल. तेव्हां मा- नोहाने परमेश्वराची विनंती करीत मटले : "हे माझ्या प्रभू, जो देवाचा माणस त्वा पाठविला, त्याने अगत्य आह्माकडे परत यावे. आणि जो मूल जन्मेल, त्याचे आह्मी कसे करावे हे आमास शिकवावे." आणि ती बायको शेतांत बसली असतां देवाचा दूत परत आला, तेव्हा तिने त्वरा करून आपल्या नव-याला बोलाविले. तो येऊन दूताला बोलला : “आ- मी तुला खोळंबा करून शेळ्यांतले करडू तयार करून तुजपुढे ठेवावें असे मागतो." तेव्हां परमेश्वराचा दूत ह्मणाला : “त्वा मला खोळंबा केला तरी मी तुझे अन्न खाणार नाही; आणि तूं होम करसील तर तो तुला परमेश्वराजवळ करावा लागेल." तो परमेश्वराचा दूत होता है तर मानो- हाला ठाऊक नव्हते, ह्मणून "तुझें नांव काय" असे दूताला त्याने वि- चारले. तेव्हां परमेश्वराचा दूत त्याला ह्मणाला "तूं माझे नांव कां पुसतोस? ते तर अपूर्व आहे.” मग मानोहाने खडकावर परमेश्वराजवळ होम केला आणि जाळ वेदीवरून आकाशांत चढला, तेव्हां परमेश्वराचा दूत वेदीच्या जाळांत चढला. यावरून तो परमेश्वराचा दूत होता असे मानोहाला कळले.

  • ) जे कोणी आपणाला परमेश्वरास अपीत किंवा जे आईबापाकडून नवसले जात.

यांस नाजीर झणत असत. जे प्रभूला नवसलेले त्यांनी आपले केश वाढवावे आणि मद्य वर्ज करावे ही त्यास खूण होतो (प्रक० ४१ क० २).