पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ इफ्ताह. [प्रक० ५५ पाठविला. मग शखेमकरांनी अबीमलेखाचा दगा केला. तेव्हां अबीमले- खाने त्यांसी लढाई करून त्यांचे नगर घेतले आणि त्यांतल्या लोकांस जिवे मारिले. आणि शखेमांत जो बुरूज होता व त्यांत जी माणसे गेली होती त्यांस बुरुजासुद्धां जाळून टाकिले. नंतर तो तेबेसास गेला आणि तेही नगर घेतले. त्या नगरांत एक मजबूत बुरूज होता, ह्मणून त्यांत सर्व लोक पळून गेले. मग अबीमलेख बुरुजाला आग लावून जाळण्यास त्याच्या दाराजवळ गेला, तेव्हां एका बायकोने अबीमलेखाच्या डोक्यावर जांत्याची वरली तळी टाकून त्याची करोटी फोडली..

  • ) एवाल व गरिजीम नामें डोंगरांमधन जे खोरे जाने त्यांत गौरजीम डोंगराच्या

पायथ्यासी शखेम वसलें होतं. २. यानंतर इस्राएलाच्या वंशांनी फिरून परमेश्वराच्या दिसण्यांत वाईट करून दुस-या देवांची सेवा केली. ह्मणन परमेश्वराने त्यांस अम्मोनीलो- कांच्या हाती दिले. त्यांनी इस्राएलाच्या वंशांस १८ वर्षे दु:ख देऊन जाचले. तेव्हां इस्राएलांनी परमेश्वराला हाक मारिली. परंतु त्याने त्यांस ह्मटले: “जा, ज्या देवांस तुह्मी निवडून घेतले त्यांस हाक मारा ; तुम- च्या दुःखाच्या वेळेस त्यांनी तुह्मास तारावे.” तेव्हां इस्राएलांनी झटलेः “आह्मी पाप केले आहे; जे कांहीं तुला बरे वाटेल ते आह्मास करकेवळ या वेळेस आमास सोडीव." त्या समयीं परमेश्वराचा जीव इस्राएलाच्या दुःखामुळे खिन्न झाला, ह्मणून परमेश्वराचा आत्मा इफ्ताह याला प्राप्त झाला. मग तो अम्मोनी लोकांवर गेला. आणि इफ्ताहाने परमेश्वरा- सी नवस करीत ह्मटले: “जर तूं माझ्या हाती अम्मोनी लोक देसील, तर मी सुखरूप माघारा आलो तेव्हा मला भेटायाला जे कांहीं माझ्या घरा- च्या दारांबाहेर येईल ते परमेश्वराचे होईल.” आणि परमेश्वराने अम्मोनी त्याच्या हाती दिले. आणि त्याने त्यांस मारिले. मग तो आपल्या घरास आला. तेव्हां पाहा, त्याची कन्या त्याला भेटायाला डफांनी व ताफ्यांनी बाहेर आली; ती तर त्याची एकुलती होती. तिजशिवाय त्यालापुत्र किंवा कन्या नव्हती. तेव्हां त्याने तिला पाहतांच आपली वस्त्रे फाडून हटले: “अहाहा माझ्या कन्ये! खा मला अगदी पाडले आहे, कां तर म्या आपले तोंड परमेश्वराजवळ उघडिले आहे आणि मला मागे फिरता येत नाही.” तेव्हां ती ह्मणाली : "माझ्या बापा, तुझ्या तोंडांतून जे