पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५५] अबीमलेख. गीदोनाला पटले : "तूं आह्मावर अधिकार कर; तूं व तुझा पुत्र व तुझा नातूही कां तर बा आमास मिद्यान्यांच्या हातांतून तारिले आहे.” परंतु गीदोन त्यांस ह्मणालाः "मी तुह्मावर अधिकार करणार नाही तर परमेश्वर तुह्मावर अधिकार करील.” प्रकार अबीमलेख. इफताह. (न्याय० ९–१२). १. अबीमलेख हा शखेमांतील उपपत्नीपासून गीदोनाचा पुत्र होता, स्याने हलकी व लुच्ची माणसे मजुरीने लावून त्यांकडून आपले सर्व भाऊ यांस जिवे मारिलें. योथाम नामें जो धाकटा तो मात्र राहिला. मग शखमांतील माणसांनी अबीमलेखाला राजा केले. तेव्हां योथाम ही गोष्ट ऐकल्यावर गरिजीम डोंगराच्या शिखरावर जाऊन आपला स्वर उंच करून शखेमांतील*) माणसांस हाका मारीत बोलला : “अहो शखेम- करानो ऐका. झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास एकदां गेली, आणि त्यांनी जैतुनाला सांगितले: तूं आमचा राजा हो. तेव्हां जैतुनाने त्यांस झटले, माझी चिकणाई म्या सोडून झाडांवर आधिकार करायास जावे काय? नंतर झाडांनी अंजिराला मटले; चल, आमचा राजा हो. तेव्हां अंजिराने त्यांस झटले म्या आपली गोडी व आपले चांगले उत्पन्न सोडून झाडांवर अधिकार करायास जावे काय? त्याप्रमाणेच द्राक्षवेलानेही त्यांस झटले : म्या आपला रस सोडून झाडांवर अधिकार करायास जावें काय? मग झाडांनी कांटे झुडपाला झटले : चल, आमचा राजा हो. तेव्हां कांटे झुडपाने झाडांस झटले : येऊन माझ्या छायेत स्वस्थ राहा; नाही तर कांटे झुडपांतून विस्तव निघून लबानोनाचे गंधसुरू जाळून टाकील! तर अहो शखेमांतील मनुष्यांनो, तुह्मी गीदोनाची लेकरे जिवें मारिली आणि अबीमलेखाला राजा करून घेतले हे करून तुह्मी गादीन व त्याचे घराणे यांसी सत्यतेने वर्जून बरे केले काय ? जर वर्तलां तर अबी- मलेखावर संतोष करा, त्यानेही तुह्मावर संतोष करावा. परंतु तसे नसले तर अबीमलेखांतून विस्तव निघून शखेमकरांस जाळून टाको आणि शखे- मकरांतूनही विस्तव निघून अबीमलेखाला जाळून टाको." असे बोलून योथाम धावत पळून गेला. मग अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे अधिकार केल्यावर देवाने अबीमलेख व शखेमकर यांमध्ये दुष्ट आत्मा