पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ गीदोन. प्रक० ५४ माझ्या हाताने इस्लाएलाला तारसील असे मला कळेल." मग तसे झाले. नंतर सकाळी गीदोन बोलला : “मजवर रागें भरूं नको झणजे मी या वेळेस मात्र बोलतो. कातऱ्याला मात्र कोरडेपण होवो आणि साऱ्या भूमीवर दहिंवर होवो.” तेव्हां त्या रात्री देवाने तसे केले. ३. तेव्हां गीदोन व आपल्या संगतींचे सर्व लोक यांनी आपली तयारी केली. परंतु परमेश्वर ह्मणाला : “तुजसंगतीं लोक फार आहेत एवढ्या वरून म्या मिद्यान त्यांच्या हाती दिला तर इस्राएल मजवर अभिमान धरून ह्मणेल की, माझ्या हाताने मला तारिले आहे, तर आतां अगत्य लोकांस असे सांग की, कोणी भितरा किंवा घाबरा असेल त्याने मागे फिरावे!" तेव्हां २२,००० माघारे फिरले व १०,००० राहिले. मग परमेश्वर बोलला: "अद्याप लोक फार आहेत, त्यांस खाली पाण्याकडे ने मग जे आपला हात आपल्या तोंडी लावून चाटीत प्याले त्यांस एकीकडे ठेव. तेव्हां या रीतीने पिणारे पुरुष गणतीने तीनशे होते आणि वरकड सर्व लोक पाणी प्यायास आपल्या गुडघ्यांवर टेकले. मग परमेश्वर म- णाला : "हे जे तीनशे पुरुष त्यांकडून तुह्मास तारीन. वरकड सर्व लोकांस आपापल्या ठिकाणी जाऊ दे.” आणि त्या रात्री परमेश्वराने गीदोनाला सांगितले की : “उठून मिद्यानांच्या तळाजवळ जा, ह्मणजे जे ते बोलतील ते ऐकसील." मग गीदोन गेला, तव्हां पाहा, एक आपल्या सोबत्याला असे स्वप्न सांगत होता की : " पाहा, म्या स्वप्न पाहिले की, सातूंच्या भाकरीने मिद्यानी तळांत लोटत लोटत एका डे-यावर येऊन तो पाडून उलथा केला." तेव्हां त्याच्या सोबत्याने उत्तर केले: “गीदोन याची तरवार ही आहे दुसरे काही नाही." ४. तेव्हां गीदोनाने त्या ३०० माणसांच्या तीन टोळ्या केल्या आणि सर्वांच्या हाती रणशिंगे व रिकाम्या घागरी आणि घागरींमध्ये दिवे दिले, तेव्हां तो सांस मध्यरात्री घेऊन तळाच्या कांठी गेला. मग यांनी रणशिंगे वाजविली व घागरी फोडल्या आणि दिवे आपल्या डाव्या हातीं धरून "परमेश्वराच्या योगे व गीदोनाच्या योगे तरवार!" असे पुकारले. तेव्हां मिद्यान्यांचे सर्व सैन्य धावत जात असतां परमेश्वराने प्रत्येकाची तरवार आपापल्या शेजाऱ्यावर लागू केली. आणि इस्त्राएला- चा माणसे मिद्यान्यांच्या पाठीस लागली. त्यानंतर इस्राएल माणसांनी