पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५४] गीदोन. १२३ नांचा हात इस्राएलावर प्रबळ झाला, तेव्हां इस्राएलाच्या वंशांनी आपल्या- साठी डोंगरांतली विवरे व गुहा केल्या. आणि इस्राएलांनी कांहीं पेरिलें असतां मिद्यानी संख्येने टोळासारिखे येऊन भूमीचे उत्पन्न नासावे आणि यांनी काही खाणे राहू दिले नाही. तेव्हां इस्राएलाच्या वंशांनी परमेश्वराची अरोळी केली. आणि परमेश्वराचा दूत येऊन योवाश याचे अफ्रांत जे एला नामें झाड होते, त्याखाली बसला. योवाशाचा पुत्र गीदोन हा गहूं मिद्यानांपासून राखायास तेथे घाण्यांत मळीत होता. तेव्हां परमेश्व- राचा दूत त्याला बोलला: "हे बलवान वीरा, परमेश्वर तुजसंगती आहे ! तूं आपल्या या बळाने जा आणि इस्राएलांस मिद्यान्यांच्या हातांतून तार, मी तुला पाठवितों की नाहीं?" तेव्हां गीदोन ह्मणाला: "तूंच मजसी बोलत आहेस याविषयी मला खूण करून दे." मग गीदोनाने होम करून तो खडकावर आणून ठेवला. तेव्हां परमेश्वराच्या दूताने आपल्या हातांतल्या काठीचे टोक होमाला लावले. तेव्हां खडकांतून अग्नीने निघून होम जाळून टाकिला; मग परमेश्वराचा दूत त्याच्या दृष्टींतून गेला. २. आणि त्या रात्री परमेश्वराने गीदोनाला सांगितले: “तूं बाल दे- वाची वेदी मोडून टाक आणि तिजजवळचे भजनवन तोडून टाक,आणि परमेश्वर जो देव याला वेदी बांधून होम कर." परंतु दिवस असतां है करायाला गीदोन भ्याला, ह्मणून त्याने रात्री तसे केले. मग सकाळी नगरच्या माणसांनी या गोष्टीविषयीं शोध केल्यावर गीदोनाने हे काम केले असे त्यांस समजले. तेव्हां त्यांनी योवाशाला सांगितले की "आ- पला पुत्र बाहेर आण, त्याला मारायाचे आहे. परंतु योवाश बोलला: "तुह्मी बालाचा वाद कराल काय? तुह्मी त्याला ताराल काय? तो देव असला तर त्यानेच आपला वाद करावा!" त्या दिवसापासून गीदोनाला यरूबाल झटले ( यरूबाल झणजे: बालानेच आपला वाद करावा). आ- णि सर्व मिद्यानी एकत्र मिळून इस्राएलावर चढून आले. तेव्हां परमे- श्वराच्या आत्म्याने गीदोनाला प्रेरिलें, ह्मणून त्याने सर्व वंशांकडे निरोप पाठविला की माझ्या मागून यावे. आणि गीदोन देवासी बोलला : "वा सांगितल्याप्रमाणे जर तूं माझ्या हाताने इस्राएलाला तारणार आहेस, तर पाहा. मी खळ्यांत लोकरीचा कातरा ठेवितो. जर कातव्यावर मात्र दाहिंवर पडेल व सारी भूमि कोरडी राहील, तर त्या सांगितले, तसे तं