पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ गीदोन. पक ० ५४ यांच्या चहुंकडल्या शबूंच्या हाती दिले. आणि जेव्हां परमेश्वर त्यां- साठी न्यायाधीश उत्पन्न करी तेव्हां परमेश्वर न्यायाधिशांसंगती असे, आणि न्यायाधिशांच्या सर्व दिवसांत त्यांस त्यांच्या शबूंच्या हातांतून तारी; कां की त्यांचे जाचणारे व गांजणारे यांमुळे जी त्यांची कण्हणी यांवरून परमेश्वराला दया येई, तथापि न्यायाधीश मेल्यावर ते फिरत आणि आपल्या पूर्वजांपेक्षा दुष्ट होत असत. २. इस्राएलाच्या वंशांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले, मग त्याने हासोराचा राजा याबीन *) याच्या हाती ते दिले, आणि त्याने वीस वर्षे त्यांज- वर पराकाष्ठेचा जुलूम केला. त्या वेळेस दबोरा भविष्यवादीण ही इस्राए- लांचा न्याय करीत असे. तेव्हां तिने याबीनाचा सेनापति सीसरा यावर जायाला बाराक याला पाठविले. तेव्हां बाराक तिला ह्मणाला : “तूं मजसंगतीं येसील तर मी जाईन." मग दबोरा त्याच्या संगती गेली. तेव्हां परमेश्वराने बाराकापुढे सीसरा, सर्व रथ व त्याचे सर्व सैन्य यांचा मोड केला आणि सीसरा आपल्या रथावरून उतरून पायांनी पळाला. आणि पळता पळतां याएल कोणी बायको इच्या डेन्यांत गेला. तेथे तो गाढ झोपेत पडला असतां याएलाने मेख त्याच्या कानसुलांत मारली. मग तो तसाच मेला). तेव्हां दबोरा व बाराक यांनी विजयानंद करून झटले: “हे परमेश्वरा, तसे तुझे सर्व शत्रु नाश पावोत, परंत तुज- वर प्रीति करणारे जसा सूर्य आपल्या बळाने निघतो तसे होवोत!' मग देश स्वस्थ राहिला.

  • ) ज्या यावीनावर यहोशवा जय पावला तो हा याबीन नव्हे (प्रक० ५१ क. ३). यहो-

शवाने हाजोराचा नाश केला होता खरा, परंतु खनान्यांनी ते नगर फिरून वाचलें. हाजोराच्या सर्व राजांस याबीन हे नाव होते असे वाटते. +) याएलाने या प्रसंगी अतिथ्य न करून कपयने हे अघोर कृन्य केलें यावरून तिचा निषेध करायास योग्य आहे. तरी आपल्या लोकांवर अतिशय प्रीति आणि सीसरा व न्याचे क्रूर व जलमी सन्य यांचा अतिशय द्वेष असल्यामुळे तिने हे कृत्य केले. याशि- वाय असे करण्यास आणखीही एक निमित्न म्हणजे त्या काळाची अशिक्षित स्थिति होय. प्रक०४४. गोदोन. (न्याय०६-८). १. नंतर इस्राएलाच्या वंशांनी परमेश्वराच्या दृष्टीत पुन्हा वाईट केले, तेव्हां त्याने त्यांस सात वर्षे मिद्यानांच्या हाती दिले. आणि मिद्या-