पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५३] न्यायाधिशांचे कालमान, दबोरा. लाविली आहे, असे बोलून तुमची संताने आमच्या संतानांस परमेश्वराच्या भक्तीपासून फिरवितील. याच गोष्टीच्या भयाने आह्मी ही वेदी बांधली. होमासाठी नव्हे व यज्ञासाठी नव्हे, परंतु आमच्या व तुमच्यामध्ये व आम- च्यामागे आमच्या पिढ्यांमध्ये ही साक्षीसाठी व्हावी. तुह्मास परमेश्वरा- कडला वांटा नाही असे पुढल्या काळी तुमच्या संतानांनी आमच्या संता- नांस सांगू नये ह्मणून आमी असे केले. आमचा देव परमेश्वर याच्या मंड- पासमोर जी त्याची वेदी तीजखेरीज आह्मी होमासाठी किंवा यज्ञासाठा दुसरी वेदी बांधून परमेश्वरावर फितूर करावा हा आह्मास अति अधर्म आमच्याने व्हायाचा नाही." या गोष्टी फीनहास व त्याच्या संगतीं मुख्य अधिकारी यांनी ऐकल्या, तेव्हां त्यांस बरे वाटले.

  • ) सभामंडपाशिवाय दुस-या ठिकाणों जर कोणी यज्ञ करील तर मोश्याच्या नियम-

शास्त्राप्रमाणे देहांत दंड करावा असी आज्ञा होतो अनु० १२. ३. यानंतर यहोशवाने इस्राएलाचे सर्व वंश शखेमांत एकवट करून परमेश्वराकडे विश्वासू राहण्याविषयी त्यांस बोध केला आणि शेवटी तो त्यांस ह्मणाला : “परमेश्वराची सेवा करणे हे तुह्मास वाईट वाटते तर ज्याची सेवा करणार त्याला आज आपणासाठी निवडून घ्या; तुमच्या पूर्व- जांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची सेवा करा; किंवा अमो-यांच्या दे- वांची सेवा करा; पण मी व माझ्या घरची मनुष्ये आह्मी परमेश्वराची सेवा करूं!" तेव्हां सर्व लोकांनी उत्तर दिले की: “आमचा देव परमेश्वर आहे' याची सेवा आह्मी करूं व त्याचे वचन ऐकू." असा त्याच दिवसीं यहो- शवाने लोकांकडून करार करविला. आणि यहोशवा ११० वर्षांचा होऊन मरण पावला. प्रक० 23. न्यायाधिशांचे कालमान. दबोरा. (न्याय ०१-५). १. यहोशवा याच्या सर्व दिवसांत इलाएलांनी परमेश्वराची सेवा के- ली. परंतु त्यानंतर जी परमेश्वराला व त्याने इस्राएलांसाठी केलेले कामही जाणत नव्हती असी दुसरी एक पिढी उत्पन्न झाली. तेव्हा इस्राएलाचे वंश परमेश्वराच्या दृष्टींत जे वाईट ते करून दुस-या देवां- च्या मागे लागले. यास्तव परमेश्वराने इस्राएलावर रागे भरून त्यांस 161