पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० यहोशवाच्या अंतकाळचे दिवस, प्रक०५२ त्यांवर पडला आणि परमेश्वराने त्यांस इस्राएलाच्या हाती दिले. ह्मणून त्यांनी त्यांस असें मारिले की त्यांचे शेष राहिले नाही. तसे यहोशवाने सर्व देश घेतला आणि देश लढाईपासून स्वस्थ झाला. इस्राएलाच्या संतानांनी जे राजे मारिले ते एकंदर एकतीस होते आणि त्यांनी त्यांचा देश वतन करून घेतला. प्रक० 22. यहोशवाच्या अंतकाळचे दिवस. (यहो० १३-२४). १. यहोशवा मातारा झाला तेव्हां त्याने देश नऊ वंशांमध्ये आणि मनस्से याच्या अर्ध वंशामध्ये वांटून दिला. परंतु लेबी वंशाला त्याने काही वतन दिले नाही, कारण की परमेश्वराचे अर्पण हेच त्याचे वतन होय. इस्राएलाच्या संतानांनी आपल्या वतनांतन लेवी यांस राहावयासाठी जाग- जागी असी ४८ शहरे शिवारांसुद्धां दिली; आणि परमेश्वराचे मंदिर सिलोहांत उभे केले. आणि परमेश्वराने इस्राएलाच्या पूर्वजांसी शपथ केली त्या सर्वांप्रमाणे त्याने त्यांस सर्व देश दिला. परमेश्वराने इस्राएला- च्या घराण्यास जी काही बरी गोष्ट सांगितली होती तींत कांहीं राहिले नाहीं अवघे प्राप्त झाले. २. त्यानंतर रऊबेनी व गादी व मनस्सेचा अर्ध वंश (प्रक० ४८ क०२.) यांस आशीर्वाद देऊन व बोध करून त्यांनी यार्देनेच्या पलिकडील आप- ल्या वतनाकडे जावे ह्मणून यहोशवाने त्यांस निरोप दिला. तेव्हां यार्दे- नेजवळ पोहंचल्यावर त्यांनी तेथे आकाराने मोठी असी वेदी बांधली. है ऐकून इस्राएलांच्या संतानांचा सर्व समुदाय त्यांवर सैन्यरूपी जायाला शिलोमध्ये मिळाला आणि त्यांनी एलाजार जो मुख्य याजक याचा पुत्र फीनहास (प्रक०४७ क०४) व त्याच्या संगतीं दाहा मुख्य अधिकारी गि- लात देशांत त्यांजकडे पाठविले. तेव्हां त्यांनी त्यांस मटले: "तह्मी आ- पणासाठी वेदी बांधून इस्राएलाच्या देवावर असे उल्लंघन का केले आहे?*) तेव्हां त्यांनी असे उत्तर दिले की: “पुढल्या काळी तुमची संताने आम- च्या संतानांस असे ह्मणतील कीं, इस्राएलाचा देव परमेश्वर यासीं तुमचा संबंध काय आहे ? तुमच्या व आमच्यामध्ये परमेश्वराने यार्देन ही सीमा