पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

E-520) प्रक० ५१] यहोशवाच्या जयाची वृद्धिः ११९ सांत ते आमच्या जवळचे आमच्या मध्येही राहतात असे त्यांनी ऐकि- लें. मग अधिकाऱ्यांनी असे मटले की: "ते वांचोत, परंतु सर्व मंडळी- साठी व परमेश्वराच्या वेदीसाठी लाकूडतोड्ये व पाणक्ये होवोत.” तेव्हां यहोशवाने त्यांस तसे केले. २. आणि यरूशलेमाचा राजा अदोनीसदेक याने यहोशवाने यरि- होचे व आयाचे जे केले ते ऐकिले. अणखी गिबोनांतल्या राहणाऱ्यांनी इस्राएलासी समेट केला हे ऐकून तो फार भ्याला. यास्तव गिबोनावर सूड उगविण्याकरितां त्याने अमोऱ्यांचे चार राजे मिळवून त्यांसी करार केला. तेव्हां गिबोनांतल्या माणसांनी यहोशवाकडे असा निरोप पाठवि- ला की: "आपल्या दासांवरून आपले हात काटूं नको, आमाजवळ लव- कर ये आणि आमचे सहाय करून आमास तार." तेव्हां यहोशवा अक- स्मात् शबूंवर गेला आणि परमेश्वराने इस्राएल लोकांपुढे त्यांस घाबरें केले. परमेश्वराने त्यांवर आकाशांतून मोठ्या गारांची वृष्टि केली आणि जे गारांच्या खड्यांनी मेले ते इस्राएलाच्या संतानांनी तरवारीने जिवे मारिले यांपेक्षा अधिक होते. त्या दिवसी यहोशवा परमेश्वरासी बोलला आणि इस्राएलाच्या देखतां ह्मणाला: "सूर्या, गिबोनावर थांबून राहा; आणि चंद्रा, आयालोनाच्या खोऱ्यावर थांबून राहा!" आणि लोक आपल्या शत्रूचा सूड घेईपर्यंत सूर्य आकाशामध्ये थांबला आणि समाप्त होण्याच्या संधीस दिवस मावळायास चालला नाही. त्या दिवसासारखा एकही दिवस त्याच्या- मागे त्याच्यापुढे झाला नाहीं की परमेश्वराने मनुष्याचा शब्द ऐकिला; कारण इस्राएलासाठी परमेश्वर लढत होता. मग यहोशवाने डोंगरवट व दक्षिण व तळवट हे सर्व देश व त्यांतील सर्व राजे मारिले. त्याने प्रत्येक श्वासवानाचा विनाश केला*). - * ) ही लढाई होऊन खनान देशांतील नैर्ऋत्य भाग इस्राएल लोकांच्या हस्तगत झाला. उत्तर बाजू मात्र खनानी लोकांच्या हातात राहिली. ३. मग हाजोराचा राजा याबीन याने हैं वर्तमान ऐकिले. तेव्हां स्याने उत्तरेकडील डोंगरांतले जे राजे त्यांसी करार केला. ते व त्यांच्या संगती त्यांचे सर्व सैन्य निघाले. ते संख्येने फारच लोक आणि घोडे व रथ यांचा मोठा समुदाय होता. ते सर्व मिळून मेरोम सरोवराजवळ एका ठिकाणी तळ देऊन राहिले. तेव्हां यहोशवा अकस्मात् येऊन