पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ यहोशवाच्या जयाची वृद्धि. प्रक० ५१ दाचे वचन सांगितले. ह्मणजे इस्राएलाच्या संतानांचे सहा वंश एवाल डोंगराकडे आणि सहा वंश त्या समोरच्या गरिजीम डोंगराकडे उभे राहिले, आणि त्यांच्याम ये याजकवर्ग कोश घेऊन उभा राहिला असतां गरिजीम डोंगराकडे तोंड करून आशीर्वादाची वचने उच्चारली. मग एबाल डोंगरा- कडे वळून शापाची वचने सांगितली. आणि सर्व लोकांनी एकएक वच- नाचे उत्तर देऊन "आमेन!"*) असे मटले. (आमेन ह्मणजे तथास्तु किंवा असे असो.)

  • ) एबाल आणि गरिीम या नांवांचे दोन डोंगर समोरासमोर आहेत.

पाणि त्यामध्ये शखेम नामें खोर आहे. उत्तर बाजूस एवाल डांगर असून तो उजाड व कड्याप्रमाणे आहे आणि गरिजीम डांगर दक्षिणेस अमन हिरवा गार व सपीक आहे. एवाल जो शापाचा डोंगर त्यावर वेटी बांधावी, नियमशास्त्र पाषाणावर कोरा. आणि तेथें यज्ञही करावे हे लक्षात आणण्यासारखे आहे. कारण की नियमशास्त्र आणि यज्ञ याचा व शापाचा संबंध जवळ जवळ आहे. नियमशास्त्र शाप उच्चारिते, परंतु यज्ञ शाप नाहींसा करीत आहे. प्रक० ११. यहोशवाच्या जयाची वृद्धि, (यहो० ९–१२). १. आणि यहोशवाने यरिहोचे व आयाचे जे केले तें गिबोनांतल्या राह- णान्यांनी ऐकिले, तेव्हां त्यांनी कपट करून वकिलांच्या मिषाने कित्येकांस पाठविले. त्यांनी आपल्या गाढवांसाठी जुनीं गोणपटें व द्राक्षरसाच्या फुटलेल्या व शिवलेल्या डबक्या, आणि आपल्या पायीं जुने व सांधलेले जोडे आणि आपल्या आंगावर जुनी वस्त्रे घेतली आणि त्यांच्या खायासाठी सर्व भाकरी वाळलेल्या व बुरा आलेल्या अशा होत्या. त्यांनी गिलगालांतल्या छावणीत यहोशवाजवळ येऊन ह्मटले: “तुझा देव परमेश्वर याच्या नामा- मुळे तुझे दास आह्मी फार दूर देशाहून आलो ; कांकी त्याची कीर्ति आणि याने मिसरांत जे केले ते अवघे आह्मी ऐकिले. अणखी यादेनेच्या पलि- कडे जे अमोऱ्यांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन व आष्टारोथांतला बाशानाचा राजा ओग यांस जे केले तेही आह्मी ऐकिले आहे: तर आतां तुझी आह्मासी करार करा." तेव्हां अधिका-यांनी परमेश्वराला न विचारतां त्यांच्या भाकरींतले कांहीं घेतले आणि यहोशवाने त्यांसी करार केला आणि मंडळीच्या अधिकाऱ्यांनीही त्यांसी शपथ वाहिली. नंतर तीन दिव-