पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ५०] आखान. आशीर्वाद व शाप. यहोशवाने तर ३००० पुरुष आय नामें नगरावर पाठविले, तेव्हां ते आ- याच्या माणसांपुढून पळाले, ह्मणून लोकांचे हृदय खचून पाणी झाले. तेव्हां यहोशवाने आपली वस्त्रे फाडली आणि इस्राएलाच्या संतानां- सुद्धां तो भूमीवर उपडा पडून सांजपर्यंत राहिला, आणि त्यांनी आपल्या डोक्यांवर माती उडविली. तेव्हां परमेश्वराने यहोशवाला सांगितले की: "इस्राएलांनी पाप केले आहे, आणि जो करार म्या आज्ञा करून त्यांसी केला त्याचे त्यांनी उल्लंघन केले, कारण की त्यांनी उत्सृष्टांतले कांहीं घेऊन चोरले आहे. उठून लोकांस पवित्र करून सांग : हे इस्राएला, तुझ्यामध्ये उत्सृष्ट वस्तु आहे. तुह्मी आपणांमधून उत्सृष्ट वस्तु कादून टाकाल तोपर्यंत आपल्या शबूंपुढे तुमच्याने उभे राहवणार नाही." मग यहोशवाने सकाळी इस्राएलाला त्यांच्या वंशांप्रमाणे जवळ आणले. तेव्हां पण पाडण्याने यहूदाचा वंश निघाला, मग त्याने यहूदाचें एकएक कूळ जवळ आणले, तेव्हां जरहीचे कूळ धरले. नंतर त्याने जरहीचे कलपुरुष जवळ आणले, तेव्हां जाब्दी निघाला. मग त्याचे घराण्याचे परुष जवळ आणले, तेव्हां आखान हा निघाला. तेव्हां यहोशवाने ह्मटले: "माझ्या पुत्रा, परमेश्वराला थोर मान, आणि वा काय केले आहे है मला अगत्य सांग." तेव्हां आखानाने उत्तर दिले : "खरे, परमेश्वर यासी म्या पाप केले आहे! लुटीत एक चांगला शिनारी झगा आणि २०० शेकेल रुपे व सोन्याची एक लगड ५० शेकेल वजन ही पाहून त्यांचा लोभ धरून म्या घेतली, आणि पाहा, ती मी माझ्या डेन्यांत गुप्त ठेवली आहेत." तेव्हां त्याच्या डेन्यांत त्यांस तसेच सांपडल्यावर यहोशवाने आखानाला मटले: “खा आह्मास त्रास कां दिला? आज परमेश्वर तुला त्रास देईल." मग सर्व इस्राएलांनी त्याला धोड्यांनी मारले व जी अवघी त्याची होती ती त्याबरोबर अग्नीने जाळली. त्यानंतर यहोशवाने सर्व लढाऊ लोकां- सुद्धां आय नगरावर जाऊन त्यांतील मनुष्यांस मारिले आणि नगर अमी- ने जाळून टाकले. ३. त्या वेळेस परमेश्वराचा सेवक मोशे याने जसी अगोदर (अनु०२७.) आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे यहोशवाने एबाल डोंगरावर वेदी बांधली आ- णि परमेश्वरासाठी होम केले. अणखी तेथे त्याने मोठे धोडे उभे करून त्यांवर शास्त्राची प्रत लिहिली, आणि सर्व लोकांस शापाचे आणि आशीर्वा.