पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यिरहो, आखान. आय. प्रक०५० हेत. या प्रसंगों तो शर लढाऊ असन त्याचे नावही लढाऊ आहे. कारण देवाच्या रा- ज्यांतले जे वैरी त्यांजवर जय मिळविणारा आणि ईश्वरी शासन करणारा असा तो आहे. यहोवा स्वतां इस्राएलाचा जसा राजा आहे तसा तो परमेश्वराच्या सर्व लदायर्यात इस्राएल लोकांचा अग्रेसर व सरदार आहे. ___+ ) रणशिंगांच्या आवाजाने आणि लोकांच्या आरोळीने यरिहोचें गांवकुसूं खाली पउले असे नाही, तर "विश्वासाने” ते पडले ( इब्री ११, ३०)... E)" विश्वासाने राहाच, जे अमान्य होते त्यांच्या संगती नाश पावली नाही" ( इब्री ११,३१). तिने यहूदा वंशांतील एका सरदारासी लग्न केले आणि त्या लग्न- संबंधाने ती दावोदाची आणि त्याकडून तारणारा खीस्त याची आदिजननी असी पदवी पावली ( माथी १, ५).. सूचना. यरिहोकरांवर आणि सर्व खनानी लोकांवर जो शापाचा हुकूम यहोशवाला परमेश्वराकडून झाला तो भारी, आणि ज्याप्रमाणे त्यांला आतां करावयाचे होते ते मोठे भयंकर खरे, तरी ते देवाचे यथार्थ व न्यायी शासन होते (प्रक० ४१ दुसरी सूचना पाहा). खनानी लोकांस देवाने बहुत काळापासून फार सहनतेने वागवून घेतले आणि त्यांवि- षयी त्याने साक्षीवांचून आपणास राहू दिले नाही. त्यांच्या दृष्टिसमोर सदोम आणि गमोरा यांची भयंकर अवस्था झाली असता त्यांनी काहीं मानिले नाही. आणि अब्राहाम, इझाक आणि याकोब यांनी त्यांच्या मध्ये प्रवास करितांना शब्दांनी आणि कृत्यांनी परमेश्वराचें नाम व्यर्थ प्रसिद्ध केले. अब्राहामाच्या दिवसांत देवाने त्यांचा नाश केला नाही, कारण अद्याप त्यांच्या पापाचा घडा भरला नव्हता (प्रक०१२ क०२).. परंतु आतां तो भरून गेला ह्मणून देवाने जसे पूर्वी सदोम व गमोरा यांच्या दिवसांत आकाशापासून अग्नि व गंधक यांची वृष्टि करून त्यांचे शासन केले, तसे त्याने आतां इस्राएलाच्या तरवारीने शासन करून त्यांचा देश इस्राएल लोकांस दिला. परंतु त्या वेळेस इस्राएल लोकांस सावध राहण्याविषयी विशेष सूचना करून सांगितले की, जसे तह्मी आतां खनानी लोकांसी करितां त्याप्रमाणे तुह्मी त्यांच्या पापांत आणि अंत:करणाच्या कठीणपणांत पडाल, तर तुह्मासही ते तसे करतील. (प्रक० ४८ क० २०). २. परंतु यहूदाच्या वंशांतील आखान याने उत्सृष्ट वस्तूंतले कांहीं घऊन लपविले, यास्तव परमेश्वराचा क्रोध इस्राएलाच्या संतानांवर पेटला.