पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ इस्राएलांचा खनान देशांत प्रवेश, प्रक० ४९ २. आणि यहोशवाने देश हेरायास दोन पुरुषांस पाठविले, ते जाऊन राहाब नामें एक बायकोच्या घरी उतरले. आणि यरिहोच्या राजाला हे वर्तमान कळले तेव्हां त्याने राहाबेला सांगून पाठविले: "माणसे तुझ्या घरांत उतरली आहेत त्यांस बाहेर काढ!" परंतु राहावेने त्यांस धाब्यावर जवसांचे कांड होते त्यांत लपवून मटले की: "माणसे मजकडे आली होती खरी, परंतु ती कोठली हे मला कळले नाही आणि अंधार पडल्यावर वेस लावायाच्या वेळेस ती निघाली; त्यांच्या पाठीस लवकर लागा, ह्मणजे यांस अटोपाल.” तेव्हां त्यांनी तसे केले. परंतु ती बायको धाब्यावर चढून त्या. माणसांस ह्मणालीः “परमेश्वराने हा देश तुह्मास दिला आहे, आणि तुम- चे भय आह्मावर पडले आहे, कारण तुह्मी मिसरांतून येतांना परमेश्वराने तुमच्या पुढे सूफसमुद्राचे पाणी कसे आटविले, हे आमी ऐकिलें आहे. तर आतां अगत्य मजसी परमेश्वराची शपथ वाहा की, म्या तुह्मावर दया के- ली ह्मणून तुह्मीही माझ्या बापाच्या घरावर दया करावी.” तेव्हां त्या माण- सांनी तसे केले. मग तिने त्यांस किरमीज सुताच्या दोरीने खिडकीतून उतरिलें. कांकी तिचे घर गांवकुसास लागून होते; आणि त्यांनी परस्परांस सुचविले की, तिचे घर जाणण्यासाठी आणि त्यांतले लोक वाचविण्यासाठी खिडकीस बांधलेला हा किरमीज सुताचा दोर खुणेस असावा. तसे ते दोन पुरुष माघारे फिरून यहोशवाजवळ येऊन सांगू लागले: "परमेश्वराने सर्व देश आमच्या हाती खचीत दिला आहे, आणि देशांतले राहाणारे आमच्यामुळे खचून गेले आहेत." ३. मग इस्राएलाची संताने यार्देन नदीपर्यंत आली. नदी तर आपली तिरें बुडवून जात होती*).तेव्हां परमेश्वराने यहोशवाला सांगितले. "आज- च्या दिवसी मी तुला सर्व इस्राएलांच्या देखतां महान् करूं लागेन: ह्मणजे ते असे समजतील कों, जसा मी मोश्यासंगतीं होतो तसा तुझ्या संगती होई- न." तेव्हां कराराचा कोश वाहणारे जे याजक ते लोकांपुढे जात अस- तां त्यांना कांठावर पाण्यांत पाय बुचकळतांच वरून उतरणारे पाणी एक रा- स होऊन उभे राहिले, आणि खारट समुद्राकडे जे पाणी उतरत होते ते अगदी सरून गेले. तेव्हां सर्व लोक यार्देनेच्या पार जात तोपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देनेमध्ये कोरड्या ठिकाणी स्थिर उभे राहिले. त्या- नतर सर्वांच्या मागून याजकही यार्देनेतून निघाले आणि नदीतले पाणी