पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ४९] इस्राएलांचा खनान देशांत प्रवेश. ११३ माच्या रीतीप्रमाणे (प्रक०३९ क०२) विचारावे.” मग मोश्याने त्या अवघ्या प्रमाणे केले आणि यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने पूर्ण झाला. त्यानंतर मोश्याने इस्राएल लोकांच्या वंशांप्रमाणे त्यांस आशीर्वाद देऊन नबो डोंगरावर गेला, आणि परमेश्वराने अवघा देश त्याला तेथून दाखविला. त्यानंतर मोशे परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मरण पावला आणि त्याने (परमेश्वराने) त्याला मवाबाच्या देशांतल्या खोलग्यांत पुरिलें, परंतु आजपर्यंत त्याची कबर कोणालाही ठाऊक नाही. आणि मोशे मेला, तेव्हां तो १२० वर्षांचा होता, त्याची दृष्टि मंद झाली नव्हती, आणि त्याची शक्ति गेली नव्हती. आणि इस्राएलाच्या संतानांनी त्यासाठी तीस दिवस शोक केला. चवथा भाग. यहोशवा आणि न्यायाधीश यांचा इतिहास. प्रक० ४९.इस्राएलांचा खनान देशांत प्रवेश. (यहो० १-५.) १. मोशे मेल्यावर परमेश्वराने यहोशवा *) याला सांगितले की: "मा- झा सेवक मोशे याने में शास्त्र तुला नेमून दिले त्या सर्वांप्रमाणे जपून करा- यास धीर धरून फार शूर हो. ते सोडून उजवीकडे किंवा डावीकडे वळं नको, आणि हा शास्त्रलेख तुझ्या तोंडापासून जाऊं नये; तर दिवसा व रात्रीं त्याचे मनन कर; आणि त्या सर्वांप्रमाणे वा जपून चालावे, कांकी तशाने तं आपला मार्ग सफळ करसील व सुज्ञतेने वागसील.

  • ) यहोशवा हे इन्त्री भाषेतले नांव आहे आणि त्याचा ग्रीक भाषेत येसूस (येश )

असा उन्नार होतो. आझा सास इहलोकींच्या कष्टरूप रानातून श्राकाशातल्या विसाव्यांत नेणारा जो येश रखीस्त त्याचे प्रतिरूप यहोशवा जसा नांवा कडून तसा कन्या- कडूनही आहे. 15 H