पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ मोश्याच्या अंतकाळचे दिवस. प्रक०४८ सांगतो. जी राष्ट्रे परमेश्वर तुजपुढून नाहींसी करितो त्यांचा जसा, तसा तुमचा नाश होईल.- ज्या राष्ट्रांचे वतन तूं घेतोस त्यांनी जादु- मीर व गारुडी यांचे ऐकिले, तुला तर तुझा देव परमेश्वर तसे करूं देत नाहीं; कारण परमेश्वर मजसी बोललाः “मी त्यांच्या भावांमधून तुजसारख्या भविष्यवाद्याला त्यांसाठी उत्पन्न करीन, आणि मी आपल्या गोष्टी त्याच्या तोडांत घालीन,आणि मी त्याला सांगेन ते अवघे लो यांस सांगेल. आणि तो माझ्या नामाने सांगेल, त्या गोष्टी कोणी न ऐकल्यास त्याचा मी झाडा घेईन *). पाहा, मी आज तुह्माविषयीं आकाश व पृथ्वी हे साक्षी करून ठेवतों ;जीवन व मरण, आशीर्वाद व शाप हीं तुजपुढे ठेवली आहेत; तूं तर जीवन निवडून घे."

  • ) मोश्यासारखा जो भविष्यवादी होणारा तो, मोशे जसा लोकांचा तार.

णारा आण त्यांजबद्दल देवासों मध्यस्थी करणारा असा होता, त्यासारखाच झाला पाहिजे. तथापि एखादा नवा करार होणे तो पूर्वीच्या करारापेक्षा उत्तम पाहिजे, त्याप्रमाणे मोश्या सारखा जो भविष्यवादी व्हावयाचा तो मोश्यापेक्षा श्रेज असणे अवश्य होते. जुन्या करारासंबंधी भविष्यवाद्यांपैकी कोणाविषयोंही हे वचन पर्ण झाले नाही. स्वता शास्त्र असेंच बोलतं की: "ज्याला परमेश्वराने तोंडोतोंड ओळखिलें तसा मोश्यासारखा दुसरा कोणी भविष्यवादी इस्राएलो त उठला नाही" (अनु० २४१०; प्रक० ३४ क. २ पाहा). परंतु नीस्त हा नव्या कराराचा स्थापणारा व सिद्धीस नेणारा आणि सर्व मनध्य मात्रा- चा तारणारा असता त्यामध्ये हे भविष्यवचन पूर्ण झाले आहे. ३. आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले की: “नबो डोंगर यरीहोच्या समोर आहे त्यावर चढून खनान देश पाहा, आणि तुझा भाऊ अहरोन होर डोंगरावर मृत्यु पावला, तसा तूं या डोंगरावर मरण पाच. कारण मरीबा याच्या पाण्याजवळ तुम्ही माझा अपराध केला" (प्रक०४६ क०१). तेव्हां मोशे परमेश्वराला म्हणाला: “परमेश्वर सर्व मानवी आत्म्यांचा देव, याने समुदायावर कोणाला नेमून ठेवावे. त्याने त्यांस बाहेर न्यावे व त्यांस आंत आणावे. ज्या मेंढरांस मेंढका नाही त्यांसारखा परमेश्वराचा समुदाय होऊ नये." परमेश्वर म्हणालाः “नूनाचा पुत्र यहोशवा (प्रक० ३३ क०३; व ४४ क० २.) ज्यावर आत्मा आहे त्या मनुष्याला तूं आपणाजवळ आणून त्यावर आपला हात ठेव आणि त्याला सर्व समुदायासमोर उभे कर, आणि इस्राएलाच्या सर्व समुदायाने त्याचे ऐकावे, म्हणून तू आपले काहीं मान त्याला दे. मग एलाजाराने त्यासाठी ऊरी-