पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक०४८] मोश्याच्या अंतकाळचे दिवस. १११ त्याच्या जवळ येऊन बोलले: “आह्मी आपले कळप व आपलीं बाळके यांस गांवकुसाच्या नगरांत ठेवू. परंतु आह्मी स्वतः आपल्या भावासंगती जाऊन प्रत्येक आपापले वतन पावेल तोपर्यंत आह्मी आपल्या घरांस परत येणार नाही." तेव्हां मोश्याने त्यांचे वतन यार्देनेच्या पूर्वेस त्यांस दिले. २. आणि असे झाले की चाळिसाव्या वर्षांत अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवसी परमेश्वराने ज्या कांहीं इस्राएलांसाठी आज्ञा केल्या होत्या त्या अवघ्यांविषयीं मोशे त्यांसी बोलून ह्मणाला : “तुह्मी देवाच्या आज्ञा जपू- न पाळा, कांकी अशाने तुमचे ज्ञान व तुमची बुद्धि राष्ट्रांच्या दिसण्यांत येईल, आणि ती हे सर्व नेम ऐकून ह्मणतील, हे मोठे राष्ट्र निश्चये ज्ञानी व बद्धिवान लोकांचे आहे. आणि जसा आमचा देव सर्व गोष्टींत आ- शाजवळ आहे, तसा दुसऱ्या कोणत्या राष्ट्रांत आहे? तर या गोष्टी आपल्या हृदयांत ठेवा आणि आपल्या लेकरांस शिकवा, ह्मणजे तूं आपल्या घरी बसतोस, वाटेने चालतोस, निजतोस व उठतोस तेव्हां त्यांविषयी बोलत जा. आणि तूं जर परमेश्वराची गोष्ट ऐकसील तर सर्व आशीर्वाद तुजवर येऊन तला प्राप्त होतील. नगरांत तुला आशीर्वाद होईल व शेतांत तुला आ- शीर्वाद होईल, तूं आंत येसील तेव्हां आशीर्वादित होसील, तूं बाहेर जासील तेव्हाही आशीवादित होसील. परंतु जर तूं परमेश्वराची गोष्ट मानणार नाहीस, तर तुजवर शाप येऊन तुला लागतील. आणि पर- मेश्वर पृथ्वीच्या या कडेपासून त्या कडेपर्यंत सर्व लोकांमध्ये तुझी दाणादाण करील, आणि राष्ट्रांमध्ये नीच मोजला जासील.-~पाहा. जी तजपेक्षा मोठी व शक्तिमान अशा राष्ट्रांचे वतन घ्यायाला तुला आज यार्देनेच्या पलिकडे जायाचे आहे, तर तूं आपल्या मनांत ह्मणू नको की, माझ्या पुण्यावरून परमेश्वराने मला हा देश वतन द्यावयास आणले; हे तुझ्या पुण्यावरून किंवा तुझ्या हृदयाच्या सरळपणामुळे नव्हे, तर त्या राष्ट्रांच्या दुष्टाईवरून तुझा देव परमेश्वर त्यांस तुजपुढून घालवितो. यास्तव तूं आपला देव परमेश्वर याची अठवण कर. कारण की महत्कार्य करायास तुला शक्ति देणारा तोच आहे.परंतु जर तुह्मी आपला देव परमेश्वर याला विसरला व दुसऱ्या देवांच्या मागे लागन त्यांची सेवा केली, तर खचीत नाश पावाल हे मी आज तुह्मास निक्षण