पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरया मोश्याच्या अंतकाळचे दिवस. प्रक०१८ दिसेल.” आणि तो त्याला घेऊन पौर डोंगर याच्या शिखरावर गेला. तेथे बलामाने आपली दृष्टि लावून एस्राएल आपापल्या वंशाप्रमाणे कसे राहिले हे पाहिले. तेव्हां देवाचा आत्मा त्यावर आला आणि तो बोलला: "हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्राएला, तुझ्या वस्त्या किती सुंदर आहेत! तुला आशीर्वाद देणारे अशीर्वादित व तुला शाप देणारे शापित होतील." तेव्हां बलामावर बालाक रागे भरला. परंतु बलाम त्याला ह्मणालाः “पाहा, हे लोक तुझ्या लोकांचे काय करतील हे मी तुला सांगतो." तेव्हां तो आपले कवन करून बोललाः “याकोबांतून तारा येईल आणि इस्राएलांतून राजदंड उठेल आणि मवाबाचा नाश करील. परंतु इस्राएल पराक्रमी होईल आणि याकोबांतला एक आधिकार करील" *).

  • ) हा भविष्यवाद प्रथम दावीद राजाविषयों आहे, कारण मवापी, भदोमी बगैरे

राष्ट्रांचा त्याने पराभव करून नाश केला. दावीद राजा स्वतः खोस्ताचे प्रतिरूप अस- हरे भविष्यवचन केवळ खीस्ताकडूनच परिपूर्ण झाल, को की तो देवाच्या राज्याचे ज वैरी त्यांचा समूळ नाश करीत आहे. ४. नंतर बलामाने मित्यानी व मवाबी यांस असी मसलत दिली की, यांनी इस्राएलास मूर्तिपूजा करण्याविषयी मोह घालावा. मग त्यांनी तसे करून इस्राएल लोकांस आपल्या देवांच्या यज्ञास बोलाविले; तेव्हां लोकांनी जेवून त्यांच्या देवांचे भजन केले. यावरून परमेश्वराने रागे भरून आज्ञा केली की, जे कोणी बाल पौरासी जडले त्यांस जिवे मारावें. आणि जेव्हां इस्त्राएलाने मित्यानांचा सूड उगविला, तेव्हां बलामही त्यांमध्ये सांपडून त्यांबरोबर नाश पावला (गण० ३१, ८). प्रक० ४८. मोश्याच्या अंतकाळचे दिवस. (गण०२६-३२; अनु०१ -३४.) १. आणि रऊबेन व गाद यांचे वंश व मनश्शे वंशाचा अर्ध भाग यां- जपासीं गुरे पुष्कळ होतीं याकरितां त्यांच्या निर्वाहास गिलाद व बाशान (प्र०७ क ०३.) प्रांतांत कुरणे बहुत असल्यामुळे ते प्रांत आपणाला वतन करून द्यावे, ह्मणून त्यांनी मोश्यास विनती केली. तेव्हां मोशे बोललाः "तुमच्या भावांनी लढायाला जावे, आणि तुह्मी एथे बसावे काय? तेव्हां ते