पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ बलाम, [प्रक०४७ बलामाजवळ पोहंचले, तेव्हां देव बलामाला बोललाः “जे पुरुष तुझ्या जवळ आले त्यांच्या संगतीं जाऊं नको,आणि त्या लोकांस शाप देऊं नको, कांतर ते आशीर्वादित आहेत.” मग बलाम बालाकाच्या दूतांस ह्मणा- ला: "आपल्या देशास जा, कांतर परमेश्वराने मला तुमच्या सं- गतीं जायास मना केले आहे." त्यावर बालाकाने यांहून अधिक व मान्य सरदार मोठी भेट देऊन पाठविले, परंतु त्यांस बलाम ह्मणालाः "बालाकाने आपले घरभर सोने व रुपै मला दिले तरी माझ्याने परमेश्वरा- च्या सांगण्यापलीकडे जाववत नाही.” आणि रात्री देव बलामाला बाले- ला: "उठून त्या माणसांसंगतीं जा; परंतु जी गोष्ट मी तुला सांगेन ती मात्र कर." २. - सकाळी बलाम आपली गाढवीं अवळून मवाबाच्या सरदारां- संगतीं गेला. पण तो गेल्यावरून देव रागे भरला. कारण की त्याला अन्यायाचे वेतन अवडले (२ पेतर २, २५). आणि त्याला अडवायास परमेश्वराचा दूत वाटेत उभा राहिला. आणि परमेश्वराचा दूत वाटेत उभा राहिलेला व त्याच्या हातीं त्याची तरवार उपसलेली असे गाढवीने पाहून वाटतून वळून शेतांत चालली, ह्मणून बलामाने तिला मारले. मग परमेश्वराचा दूत मळ्यांच्या गल्लीत उभा राहिला. इकडे भिंत व तिक- डे भिंत होती, आणि उजवीकडे किंवा डावीकडे वळायास वाट नव्ह- ती. तेव्हां गाढवी बलामाखाली बसली, ह्मणून बलामाने रागे भरून गाढ- वीला काठी मारली. तेव्हां परमेश्वराने गाढवीचे तोंड मोकळे केले आणि तिने बलामाला मटले : “म्या तुझे काय केले ह्मणून त्वा मला आतां तीन वेळा मारले?" बलाम बोलला : "माझ्या हाती तरवार असती तर बरे; म्या आतां तुला जिवे मारले असते.” मग परमेश्वराने बलामाचे डोळे उघडिले तेव्हां त्याने परमेश्वराचा दूत पाहिला. तो त्याला ह्मणा- ला: "पाहा, मी तुला अडवायास निघालो ; कांकी तुझा मार्ग मला विप- रीत वाटतो." तेव्हां बलाम बोललाः “म्या पाप केले; तर आतां तुझ्या दृष्टीत जर वाईट आहे तर मी आपला परत जाईन." परमेश्वराचा दूत बोलला : "त्या माणसांसंगतीं जा, परंतु जी गोष्ट मी तुला सांगेन ती मात्र बोल." तसा बलाम बालाकाकडे गेला*).