पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक०४७ बलाम. +पितळी साप काठीवर उंच करणे हे खांबावरील आपल्या मरणाचे प्रतिरूप आहे असे येश खीस्ताने मानिले. यासाठी तो म्हणतोः “जसा मोश्याने रानौत साप संत केला तसे मनुष्याच्या पत्राला उंच केले पाहिजे. यासाठी की न्याजवर जो कोण विश्वासतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकाळचे जीवन व्हावे" (योह० ३, १७. २५). ४. मग इस्राएलाचा समुदाय अर्णोन *)नदीपर्यंत पोहंचल्यावर त्यांनी अमो-यांचा राजा सीहोन याकडे दूत पाठवून मटले : “मी तुझ्या देशा- मधन जातो, आह्मी शेतांकडे किंवा मळ्यांकडे वळणार नाही, आणि विहिरीतले पाणी आह्मी पिणार नाही.” तेव्हां सीहोन आपले सर्व लोक मिळवून इस्राएलासी लढायास बाहेर आला, यास्तव इस्राएलांनी तरवारी- ने त्याला मारून अर्णोन नदीपासून याब्बोक नामक नदीपर्यंत त्याचा देश घेतला. तेव्हां बाशानाचा राजा ओग त्यांसी लढायास निघाला त्याला- ही त्यांनी मारिले व त्याचा देश घेतला. _* ) अर्णोन नदी मृतसमुद्रास जाऊन मिती आणि याब्वॉक इचा ओघ यार्देनेस मिळतो. त्या दोन नद्यांमध्ये जो देश आहे नो त्या वेळेस अमोरी राजा सीहोन याच्या ताब्यात होता. अर्णोनापासून दक्षिणेस मवाबी लोक राहात होते आणि यायोकापा- सन उत्तरेस (वाशान प्रति ) ओग नामें महाकाय राजा राज्य करीत होता. यादेंने- च्या पर्वेकडील जो देश तोही सर्व आपल्यासाठीच आहे हे इस्राएल लोकांस प्रथम मा- हीत नव्हते, यामुळे तो घेण्याचा पहिल्याने त्यांचा इरादा नव्हता. प्रक०४७. बलाम. (गण० २२-२५.) १. त्यानंतर इस्राएलाच्या संतानांनी मवाबांतल्या अरण्यांत यार्देनेच्या अलीकडे यरिहोजवळ डेरे दिले. आणि इस्राएलांनी अमोऱ्यांसी में केले ते सर्व मवाबी राजा जो बालाक, त्याने पाहिले, आणि त्यामुळे मवा- बी फार घाबरे झाले. तेव्हां बालाकाने मसोपोटामियांतील पथोरकर बलाम याकडे दूत पाठवून त्याला सांगितले : “पाहा, मिसरांतून लोक निघाले, ते पृथ्वीची पाठ झाकतात व ते माझ्यासमोर उतरले आहेत; तर आतां ये आणि त्या लोकांस मजसाठी शाप दे, कां तर ते मजपेक्षा बळकट आहेत, तर मी जाणतो की, ज्याला तूं आशीर्वाद देतोस तो आशीर्वादित होता, आणि ज्याला शाप देतोस तो शापित होतो." मग ते दृत