पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ इस्राएलाचे चाळीस वर्षे रानांत भटकणे, प्रक० ४६

  • ) अमोरी नामक डोंगरी प्रदेश पालेस्टेन किंवा खनान देश याची दक्षिण सीमा होती,

न्या प्रदेशातील डोंगर फार उंच असल्यामुळे ते चढून जायाला अवघड होते झणून मोश्याने असे योजिले कों, आपण पूर्वेकडून यादैन नदी उतरून जाऊन वचनदत्त देश घ्यावा. तिकडे जायाला जवळचा मार्ग अदोमी देशातन (मतसमद्राच्या दक्षिण बाज़ जवळन ) होता. परंतु अदोमी देशानन जाऊ देण्याविषयी त्याचे नम्रतेचे मागणे अदो- मी यांनी न ऐकिल्यामुळे आणि ते लोक इस्राएलाच्या कुळसंबंधी होते ह्मणून न्यासी लढाई करण्याचा हुकूम नसल्यामुळे इस्राएल लोक निरुपायो होऊन त्यास मोठे चकर घेऊन अदोमी देशाच्या बाहेरून जाण्याचे अगन्य पडले. यासाठी ते फिरून लव्हाळ समद (अकावा नामक अखात) एथपर्यंत दक्षिणेस येऊन अदोमी डोगरी प्रदेशाच्या पूर्व वाजने उत्तरेस यादेंन नदीकडे जाण्यास प्रवर्तले. ३. आणि इस्राएलांचा समुदाय कादेश सोडून होर डोंगरापर्यंत आला. तेथें अहरोनाला मरण प्राप्त होऊन आपल्या लोकांत मिळून जायाचे होते, ह्मणून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोश्याने अहरोन व त्याचा पुत्र एलाजार यांस घेऊन होर डोंगरावर नेले, आणि तेथे मोश्याने अहरोना- चीवस्त्रे (मुख्य याजकाचा पदवीपोशाक) यावरून काढून एलाजार याला घातली. आणि अहरोन तेथे डोंगराच्या माथ्यावर मेला आणि इस्राएलाच्या. सर्व समुदायाने अहरोनाविषयीं तीस दिवस शोक केला. मग ते अदोम देशाला फेरा घालून जायास हारे डोगर सोडून सूफ समुद्राच्या वाटेने निघाले, तेव्हां वाटेमुळे लोकांचा जीव त्रासला आणि ते देवावर व मोश्यावर बोलले: "तुह्मीं आमास रानांत मरायास मिसरांतून कां आणले ? कां तर अन्न नाहीं, पाणी नाही, या फार हलक्या अन्नाला तर आमचा जीव कंटाळ- ला आहे." मग परमेश्वराने आग्ये साप *) लोकांमध्ये सोडले, ते लोकांस डसले व इस्राएलांतील बहुत लोक मेले. तेव्हां लोक मोश्याकडे येऊ- न बोलले: “आह्मी पाप केले आहे; परमेश्वराची प्रार्थना कर की, त्याने साप आह्मावरून दूर करावे." मग मोश्याने लोकांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले : "आपणासाठी आग्या साप करून तो उंच काठीवर बसीव. मग असे होईल की कोणी डसलेला त्याजकडे पाहून जगेल." मग मोश्याने पितळी साप करून तो उंच काठीवर बसविला. मग साप कोणाला डसला तर तो त्या पितळी सापाकडे दृष्टि लावून वांचे ).

  • ) ह्यास भाग्ये साप म्हटले आहे याचे कारण त्यांचा दंश अग्निप्रमाणे व सूज

थाणणारा असा होता.