पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ४६] इस्राएलाचे चाळीस वर्षे रानात भटकणे. १०५ त्यांची नवी पिढी झाली. परंतु ज्या प्रभूने त्यांस नाकारिलें तो आपला करार विसरला नाही, आणि जी त्यांची लेकरे वचनदत्त देशांत पोहं- चवायाची होती त्यांकरितां परमेश्वराने त्यांस मान्नाने पोशिले आणि त्यांस खडकांतील पाणी पाजले आणि त्यांस वस्त्रेही देऊन त्याने त्यांच्या अवघ्या गरजा पुरविल्या ( अनु०८, ३, ४; अ० २९, ५), १. आणि चाळिसाव्या वर्षातील पहिल्या महिन्यांत इस्राएलाचा सर्व समुदाय फिरून कादेशाजवळच्या रानांत आला. तेथे मिर्याम मेली. आणि समुदायासाठी पाणी नव्हते ह्मणून ते मोशे व अहरोन यांवर मिळाले. तेव्हां ते उभयतां मंडळीपुढून सभामंडपाच्या दाराजवळ जाऊन उपडे प- डले. तेव्हां परमेश्वराचें तेज त्यांस दिसले. मग परमेश्वराने मोश्याला सांगितले की "ती काठी घे आणि तूंव तुझा भाऊ अहरोन समुदायाला एक- त्र करा; मग तुह्मी त्यांच्या देखतां खडकाला बोला आणि तो आपले पाणी दे- ईल." मग मोशे व अहरोन यांनी खडकापुढे मंडळी मिळविली व त्यांस ह्म- टले: “अहो फितूरकरी, ऐकून घ्या, आमी तुह्मासाठी या खडकांतून पाणी कादं काय?" मग मोश्याने आपला हात उभारून खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हां पुष्कळ पाणी निघाले. आणि मोशे व अहरोन यांस परमे- श्वर बोललाः "तुझी इस्राएलाच्या समुदायासमोर मला पवित्र मानायास मजवर विश्वास ठेवला नाही यामुळे तुमी या मंडळीला त्या देशांत आणणार नाही." २. आणि मोश्याने कादेशांतून अदोमाच्या राजाकडे दूत पाठवून त्याला सांगविले की: "तुझा भाऊ इस्राएल असे ह्मणतो, जे कष्ट आह्मास मिसरदेशांत प्राप्त झाले आणि परमेश्वराने आमास मिसरांतून कसे काढले हैं सर्व तुला कळले आहे. तर पाहा, तुझ्या देशाचे शेवटले नगर कादेश यांत आह्मी आतां आहौं, कृपा करून आमास तुझ्या देशामधून जाऊंदे; शेतां- तन व मळ्यांतून आमी जाणार नाही, आणि विहिरीतले पाणी पिणार नाहीं. आमी राजमार्गाने चालून तुझ्या सिमेतून पार होऊं तोपर्यंत उजवीकडे कि- या डावीकडे फिरणार नाही." तेव्हां अदोम याने त्याला मटले "माझ्यावरू- जाऊ नको, गेलास तर मी तुजवर तरवार घेऊन भेटीस बाहेर येईन." आणि अदोमी यांसी लढायास बहुत लोकांसंगती बाहेर आले, यास्तव इस्राएल त्याजवळून फिरले *). 141