पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ इस्राएलाचे चाळीस वर्षे रानांत भटकणे. प्रक० ४६ टणे घेऊन त्यांत वेदीवरला अग्नि घाल आणि धूप ठेवून लवकर समुदायांत जा आणि त्यांसाठी प्रायश्चित्त कर. तसे करून अहरोन मंडळीमध्ये धावला. तेव्हां पाहा, पटकी लोकांस होऊ लागली होती, परंतु त्याने धूप घालून प्रायश्चित्त केले. असा मेलेले व जिवंत यांमध्ये तो उभा राहिला आणि पट की बंद झाली. - ३. नंतर परमेश्वराने मोश्याला असे सांगितले की, "इस्राएलाच्या पूर्व- जांच्या घराण्यांप्रमाणे एक एक काठी अस्या बारा काठ्या घेऊन एके- काचे नांव त्याच्या त्याच्या काठीवर लिही, आणि लेवीच्या काठीवर अह- रोनाचे नांव लिही आणि त्या सभामंडपांत संकेतलेखाच्या पुढे ठेव. मग असे होईल की ज्या मनुष्याला मी निवडून घेतो त्याच्या काठीला अंकुर फुटेल.” मग मोश्याने इस्राएलाच्या संतानांस सांगितले आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याला काठ्या दिल्या. त्या मोश्याने मंडपांतील संकेत- लेखाच्या कोशासमोर ठेविल्या. आणि सकाळी मोशे संकेतलेखाच्या मंडपांत गेला, तेव्हां पाहा, अहरोनाची काठी फुटली, ह्मणजे तिला अंकुर आले व फुले उमलली बदामही आले. तेव्हां मोश्याने सर्व काच्या बाहेर इस्राएलाच्या सर्व संतानांजवळ आणल्या; मग त्यांनी पाहून एकेकाने आपापली काठी घेतली. तेव्हां परमेश्वर ह्मणाला की “अहरोनाची काठी पुन्हा संकेतलेखापुढे ठेवून ती खूण होण्यासाठी राख." प्रक० ४६. इस्राएलाचे चाळीस वर्षे रानांत भटकणे. (गण० २० व २१.) उपोदयात.–परमेश्वराकडून नाकारिले गेल्यामुळे इस्राएल लोक अड- तीस वर्षेपर्यंत रानांत इकडून तिकडे भटकत होते. त्यांनी परमेश्वराचे शाब्बाथ बाटविले, त्याच्या न्यायांस त्यांनी तुच्छ मानले, आणि त्याच्या नेमाप्रमाणे ते वर्त्तले नाहींत (यहेज० २०). यज्ञ व बलिदाने त्यांनी आ. पिली नाहींत, मोलखाचा मंडप व त्यांचा देव रेफान याचा तारा, या- च्या मूर्ति त्यांनी आपल्यासाठी केल्या (प्रेषि०७, ४२. ४३; अमोस ५, २६. २७ ). जे मिसरांतून आले त्यांची प्रेते तर रानांत पडली आणि