पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ४५] कोरह याचा तट. १०३ मिळाला आहां; अहरोन तर काय की तुह्मी त्याजवर कुरकुरतां?" तेव्हां मोश्याने दाथान व अबीराम यांस बोलावणे पाठविले, परंतु त्यांनी ह्मटले: "आह्मी वर येणार नाही. बा आमास रानांत जिवे मारावे, ह्मणून दूध व मध वाहण्याच्या देशांतून आमास वर आणले हे थोडें ह्मणून तूं आह्मावर कठोर धनीपण करसीलच काय?"

  • ) कोरह हा लेवी वंशांतील असतां अनाधिकाराने याजकपण मिळवायास इच्छित

होता. तसेच रऊबेन याकोबाचा ज्येष्ठ पुत्र होता व दाथान व अबीराम हे त्या ज्येष्ठ वंशातले असता अधिकार प्राप्त करून घ्यायास पाहत होते झणूनच त्यांनी तट केला. २. मग मोशे कोरहाला बोललाः "तूं व तुझा सर्व समुदाय, ह्मणजे तं व ते व अहरोन उद्यां परमेश्वरासमोर असा आणि तुह्मी प्रत्येक धूप परमेश्वरासमोर अर्पण करा.” तेव्हां त्यांनी तसेच केले. आणि मोशे उठन दाथान व अबीराम यांजकडे गेला. आणि त्याने लोकांस सांगितले की: “या दुष्ट मनुष्यांच्या डेव्यांपासून दूर व्हा, नाही तर तली त्यांच्या अवघ्या पापांमध्ये नाश पावाल." मग लोक तटवाल्यांच्या डेयांच्या चहुंकडून उठून गेले. तेव्हां मोशे बोलला: “मी आपल्या- च बद्धीने ही सर्व कामे केली नाहीत, तर परमेश्वराने मला पाठविले आहे है यावरून जाणा की, जर ते सर्व मनुष्यांच्या मरणाप्रमाणे मरतात तर परमेश्वराने मला पाठविलें नाहीं; परंतु जर परमेश्वर कांहीं नवी गोष्ट घडवितो, आणि भूमी आपले तोंड वासून यांस व त्यांच्या अवघ्यांस गिळती तर तुह्मी जाणाल की त्या माणसांनी परमेश्वरास धिकारिले आहे." मग असे झाले की, त्याने या गोष्टी बोलण्याची समाप्ति केली तेव्हांच त्यांच्या खालची भूमि उकलली आणि पृथ्वीने आपले तोंड पसरून ते व त्यांची घरे गिळली. तेव्हां सर्व इस्राएली त्यांचा आकांत ऐकून पळाले, आणि परमेश्वराकडून अग्नि निघाला आणि त्याने ते धूप अर्पणारे २५० पुरुष जळून गेले. नंतर सकाळी इस्राएलाच्या सर्व समदायाने मोश्यावर व अहरोनावर कुरकुर करीत मटले: तुह्मी परमेश्व- राच्या लोकांस जिवे मारिले.” आणि मोश्यावर व अहरोनावर समुदाय मिळाला असता त्यांनी सभामंडपाकडे दृष्टि लाविली. मग परमेश्वराने मोग्याला सांगितले की, "या समुदायांतून निघून जा, मणजे मी एका क्षणी त्यांचा नाश करीन." तेव्हां मोश्याने अहरोनाला सांगितले: “धपा-