पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ कोरह याचा तट. प्रक०१५ मेश्वर बोललाः “म्या क्षमा केली आहे, तथापि ज्या सर्व माणसांनी मिसरांत व रानांत माझे चमत्कार पाहिले, परंतु एवढ्यांत दाहा वेळां माझी परीक्षा केली त्यांच्या पूर्वजांस जो देश म्या शपथेने देऊ केला, तो त्यांतील कोणीही पाहणार नाही. पण यहोशवा व कालेब यांचा वेगळा स्वभाव होता, यास्तव त्यांस मी तेथे नेईन. परंतु तुह्मी वीस वर्षांचे व त्यावरील वयाचे निश्चये त्या देशांत पोहंचणार नाहींत. तुमच्या बाळ- कांस मी तेथे नेईन आणि जो देश तुह्मी तुच्छ केला त्याचा अनुभव ते घेतील. तुमचीं प्रेते या रानांत पडतील तोपर्यंत ४० वर्षे तुमची लेकरें या रानांत फिरतील. जितके दिवस तुह्मी देश हेरिला तितक्यांच्या संख्येप्रमाणे असी ४० वर्षे तुह्मी आपला अन्यायाचा भार सोसाल!" आणि ज्या मनुष्यांनी देशाचे वाईट वर्त्तमान आणले ते परमेश्वरासमोर मरीने मेले, परंतु यहोशवा व कालेन, हे जगले. तेव्हां लोकांनी फार शोक केला. मग सकाळी उठून ते म्हणाले: “पाहा, आह्मी वर जायाला तयार आहो. आम्ही तर पाप केले आहे.” तेव्हां मोशे बोललाः "हे सफळ होणारच नाही, म्हणून वर जाऊ नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही." तथापि ते हूड होऊन चढले. तेव्हां अमालेकी व खनानी यांनी उतरून त्यांस मारून भडकावले. प्रक०४८. कोरह याचा तट. (गण० १६ व १७.) १. आणि लेवी वंशांतला कोरह आणि रउबेनाचे वंशज दाथान व अबीराम* ) यांनी तट केला. ते व इस्राएलाच्या संतानांतले अधिकारी व नामांकित असे २५० पुरुष मोशे व अहरोन यांवर मिळून त्यांस बोलले: "तुझी मोठेपण मिरवितां, कां की सर्व समुदायांतले सर्वच पवित्र, तर तुह्मी आपणांस परमेश्वराच्या मंडळीवर कां उंचावितां?" तेव्हां मोशे कोरहाला व त्याच्या सर्व समुदायाला असे बोललाः "परमेश्वराचे कोण व पवित्र कोण व आपणाजवळ येऊ देईल ते कोण, हे तो सकाळी कळ- वीलच. लेवीच्या वंशानो, तुझी मोठेपण मिरवितां. इस्राएलाच्या देवाने तुह्मास वेगळे केले की तुह्मी मंडपाचे काम करावे, हे तुह्मास उणे आहे काय ? याजकाचे कामही मिळवायास पाहतां काय? तुह्मी परमेश्वरावर