पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हेर, प्रक० ४४ असे झाले की, मांस त्यांच्या दांती होते इतक्यांत परमेश्वराने लोकांवर फार भारी पटकी लावली. त्या ठिकाणाचे नांव किनाथहत्तवा (सोस घेणान्यांच्या कबरी) असे पडले. कारण की त्यांनी तेथे सोस घेणाऱ्या लोकांस पुरिलें. २. आणि मिर्याम व अहरोनहीं मोश्याविरुद्ध बोलून ह्मणूं लागली की: पर- मेश्वर केवळ मोश्याकडूनच बोलला आहे काय? आमाकडूनहीं बोलला ना- हीं काय?" आणि परमेश्वराने ऐकिले. तो मनुष्य मोशे तर फार नम्र, भमीच्या पाठीवरल्या सर्व मनुष्यांमध्ये नम्र होता. तेव्हां मोशे व अहरोन व मिर्याम यांस परमेश्वराने एकाएकी सांगितले की: “तुह्मी तिघे जण बाहेर सभा- मंडपाकडे या!" तेव्हां ती तिघे बाहेर आली. आणि परमेश्वर मेघाच्या खांबांत उतरून बोलला: "माझ्या गोष्टी ऐका; तुमच्या मध्ये भविष्यवादी असला तर त्याला मी दृष्टांताने प्रगट होईन आणि स्वप्नांत त्यासी बोलेन; माझा सेवक मोशे तसा नाहीं; तो माझ्या सगळ्या घरांत विश्वासू आहे. मी प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यासीं बोलत जाईन, कूट वाक्यांनी नाहीं; आणि तो परमेश्वराचे प्रतिरूप पाहील; तर माझा सेवक मोशे याजवर बोलायास तुमी कां भ्याला नाहीं !" तेव्हां मेघ मंडपावरून गेला, आणि पाहा, मिर्याम बर्फासारखी कोडी झाली. परंतु मोशे परमेश्वराजवळ ओरडत बोललाः "हे देवा, इला तूं चांगले कर" परमेश्वर बोलला : “तिला सात दिवस छावणी बाहेर कोंडून ठेवा, नंतर तिला आंत घ्यावे." प्रक० ४४. हेर. (गण० १३ व १४.) १. इस्राएल फारान नामें रानांतील कादेशबार्ष्या (खनान देशाची दक्षिण सीमा) एथे पोहंचले. तेव्हां मोश्याने देशांत काय चालले आहे याचा शोध करायासाठी प्रत्येक वंशांतला एकएक माणूस असीं बारा मा- णसे परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे हेर करून पाठविली. ती जाऊन देश पाहून अकोल ओहळापर्यंत आली. तेथल्या द्राक्षांच्या एकाचा फांटा घोसासकट तोडून तो दोघांनी काठीवर वाहिला, आणि कांहीं दाळिंबे व कांहीं अंजीर त्यांनी घेतले. मग ४० दिवसांनी देश हेरून माघारी येऊन त्यांनी सर्व समुदायाजवळ वर्तमान आणले व त्या देशांतले फळ सांस