पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ४३] इस्राएलांचा सीना डोंगरापासून प्रवास. ९९ कोणी दरिद्री नसावा (अनु० १५,४).- १०) बैल मळणी करतो तेव्हां त्याला मुसके घालूं नको (अनु० २५,४).

  • ) यावरून कोणी असे समजू नये की एखाद्याने आपले वाईट केले. तर आपण

त्याच्यावदला त्याचे वाईट करावे. हे सरकारी अधिकारी व न्यायाधोश यांस मात्र लाग आहे. जेव्हा ते न्याय करितात तेव्हा एखाद्या अपराध्याने जो अपराध केला असेल त्याच्यावदला त्यास या प्रकारे शासन करावे. अनु० १९,१८-२१. मात्यो ५,३७. २८.३९. प्रक° ४३. इस्राएलांचा साना डोंगरापासून प्रवास. (गण०१०-१२.) १. एक वर्षभर इस्राएलाची संताने सीना डोंगरापासी राहिली होती. मग दुस-या वर्षी दुसन्या महिन्याच्या विसाव्या दिवसी मेघ संकेतलेखाच्या मंडपावरून वर चढला. तेव्हां मंडप उस्तरून लेव्यांनी उचलून लोक आपल्या वंशांच्या क्रमाने निघाले. तसेच इस्राएलाची संताने सीना रानांतून आपल्या मजलांनी चालू लागली. परंतु त्यांमध्ये परक्यांचा जो समुदाय होता (प्रक० ३२ क० ३.) त्यांनी सोस घेतली आणि इस्रा- एलाची संताने देखील पुन्हा रडत बोललीं की: “आह्मास मांस खायाला कोण देईल! जे मासे आह्मी मिसरांत फुकट खाले त्यांची अठवण आ- मास आहे ; काकड्या व खरबूजे, शाक, कांदे व लसूण यांचीही आह्मास अठवण आहे. या मानाखेरीज आमच्या दृष्टीस कांहीं पडत नाही!" तेव्हां परमेश्वर फार रागे भरला आणि मोश्यालाही वाईट वाटले: आणि तो परमेश्वराला बोललाः "या सर्व लोकांचे ओझें मज एकम्याच्याने वाहवत नाही, कारण ते मजपेक्षां भारी आहे." तेव्हां परमेश्वराने मोश्या- ला सांगितले की: "इवाएलाच्या वडिलांतले ७० मनुष्य यांस माझ्या- जवळ सभास्थानांत घेऊन ये. मग मी तेथे उतरून तुजवर जो आत्मा त्यांतला घेऊन त्यांवर ठेवीन, मणजे ते तुजसंगती या लोकांचे ओझें वाहतील. आणि लोकांस सांग, उद्यां परमेश्वर तुह्मास मांस खायास होईल. महिनाभर तुह्मास कंटाळा येईपर्यंत तुझी खाल.” मग मोश्याने नमैच केले. आणि परमेश्वराकडून वारा सुटून त्याने समुद्रावरून लाये आले आणि लोकांनी उठून त्या सगळ्या दिवसी लावे गोळा केले. आणि