पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्राएलांच्या सणाचे समय. प्रक०४० बोकड जवळ आणून आपले दोन्ही हात त्याच्या डोक्यावर ठेवावे. आणि इस्राएलाच्या संतानांचे सर्व अन्याय त्यावर पत्करावे. नंतर योग्य माण- साच्या हाते तो बोकड रानांत नेऊन सोडून द्यावा; तसे बोकडाने आपणावर त्यांचे सर्व अन्याय घेऊन ओसाड देशांत जावे. .) "भजाजेल" हा शब्द मराठो तरजम्यामध्ये नाही. त्याबद्दल "सुटा वोकड" असे न्याचे भाषांतर केले आहे. पण सुटा बोकउ यावरून परावर बोध होणे अशक्य. पहिला बोकड एका व्यक्तीसाठी आहे, ह्मणून दुसरा बोकउही एका दुसऱ्या व्यक्तीसाठी- च असावा. आणि तो दुसरो व्यक्ति सैतान असेल असे अनुमान होते. टीकाकारांपैकी बहुतांचे मतही असेच आहे. याविषयी पुदील सुचनेवरून लक्षात येईल. सूचना.-प्रायश्चित्त होण्याचा दिवस संपूर्ण लोकांसाठी विशेष पश्चात्ताप, विनंती आणि उपास करण्याचा दिवस होता. त्या दिवसीं जो बोकड लोकांच्या पापार्पणासाठी नेमला होता त्याचा यज्ञ केल्याने (वर्षांत एकदां) संपूर्ण लोकांच्या पापांचे प्रायश्चित्त होत असे. मग ज्या पापांविषयी प्रायश्चित्त होई ती पापे दुसऱ्या बोकडाच्या डोक्यावर ठेवली जात, आणि तो बोकड त्या प्रायश्चित्त झालेल्या पातकांसुद्धां अजाजेल (सैतान) याकडे ओसाड रानांत पाठवीत असत. यासाठी की जी पापै त्याकडून आली ती त्याकडे परत जावी, आणि तो मनु- ष्यांचा अपवादी असतां त्याची खातरी व्हावी की इस्राएलावर दोष ठेवण्यास आपणास आतां कांहीं सत्ता नाही.-जुन्या करारांत जे कांहीं प्रायश्चित्त करण्याचे सांगितले ते त्या दिवसी लाक्षणिक अर्थाने होत असे, आणि ते येशू खीस्ताच्या मरणाच्या दिवसी खरोखर झाले आहे. कारण प्रायश्चित्ताच्या दिवसी जे छायारूपी व प्रतिरूपी दर्शविण्यांत आले ते ख्रीस्ताच्या मरणाच्या दिवसी प्रत्यक्ष पूर्ण झाले आहे. त्याच दिवसीं खरा व सर्वकाळ टिकणारा मुख्ययाजक जो ख्रीस्त त्याने "आपल्याच रक्ताने परमपवित्रस्थानांत एकदांच जाऊन अक्षय खंडणी मिळविली आहे" (इब्री ९,१२). तेव्हापासून “आम- च्या भावांचा अपवादी आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांवर दोष ठेवीत असे, तो खाली टाकलेला आहे, त्याला तर त्यांनी कोकराच्या रक्ता- कडून जिंकिले आहे (प्रग० १२,१०.११).