पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भक प्रक० ४१] खाण्याविषयी नियम.- नवस. ९७ प्रक० ४१. खाण्याविषयी नियम.- नवस. (लेवी० ११. (अनु० २४), लेवी ० २७. गण० ६, ३०). १. आणि परमेश्वर मोश्याला व अहरोनाला ह्मणालाः "पृथ्वीवरील सर्व जिवांतले जे तुझी खावे ते हेच, ह्मणजे चतुष्पाद जनावरांमध्ये ज्यांचे खूर दभागलेले आहेत आणि जे रवंथ करतात, ते सर्व खावे. केवळ रवंथ कर- णारे किंवा दुभागलेल्या पायांचे (उंट, ससा, डुकर इत्यादि) यांचे कांहीं मांस खाऊ नका. जलचरांतील ज्यांस पंख व खवले आहेत ते सर्व खावे; ज्यांस पंख व खवले नाहीत ते तुह्मास ओगळ, पक्ष्यांतली जी काहीं हिंसक आहेत ती व कीटक, आणि उडणाऱ्यांपैकीं स्तनपान करणारे हे सर्व तमास ओंगळ, आणि जो कोणी रक्त खाईल त्याला मी त्याच्या लोकांतून छेदीन, कारण की देहाचे जीवन रक्तामध्ये आहे. आणि ते तुह्मास प्रा- यश्चित्तासाठी दिले आहे. सूचना.-इस्राएलांनी आपल्या खाण्यांत भेद मानावा याचे कारण लेवी० २०,२४-२६ (प्रेषि० १०,१०-१६ पाहा) यांत असे दाखविले आहे की, "ज्याने तुह्मास अन्य लोकांपासून वेगळे केले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे, ह्मणून शुद्ध व अशुद्ध यांचा भेद करा. कां की मी परमेश्वर पवित्र आहे आणि तुह्मी माझे असावे, ह्मणून म्या तुह्मास अन्य लोकांपासून वेगळे केले आहे." देवाने आपणांस दुस-या राष्ट्रांपासून निवडून वेगळे केले, ह्या त्याच्या उपकाराची आपल्या रोजच्या खाण्यापिण्यावरून अठवण असावी, आणि जसा परमेश्वर पवित्र आहे तसे आपणही पवित्र व्हावे. आपल्या सभोवतालचे अधर्मी विदेशी यांच्या सारखे अपवित्र आपण होऊ नये याची अठवण राहावी, यासाठी हे नेम त्यांस दिले होते. परंतु जी अधर्मी राष्ट्र अशुद्ध जनावरांनी दर्शविली आहेत ती जेव्हां- पासून देवाच्या राज्यांत घेण्यांत आली, आणि त्यांमध्ये व इस्राएला- मध्ये जो भेद होता तो नाहीसा झाला, तेव्हापासून खाण्याविषयींच्या नेमाकडून आमी मोकळे झालो (प्रेषि० १०,१५). यासाठी पौल ख्रिस्ती लोकांस असा बोध करतो की: "खाण्याविषयी किंवा पि- ण्याविषयी कोणी तुह्माला दोष लावू नये. ती होणाऱ्या गोष्टीची छाया असी आहेत, परंतु शरीर खीस्ताचे आहे" (कल०२,१६.१७) 13H