पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ४०] इस्राएलांच्या सणाचे समय. इस्राएलाचा देव यासमोर दर्शनास यावे. पहिला महिना (निसान कि- वा अबीब (मार्च-एप्रिल) यांतील शुद्ध चतुर्दशीस संध्याकाळापासून परमेश्वरासाठी वल्हांडण सण असावा, आणि पंधराव्या दिवसापासून बेखमीर भाकरीचा सण असावा. सात दिवस बेखमीर भाकरी खा (प्रक० ३२ पाहा). आणि तेव्हां तुह्मी आपल्या पिकाची पहिली पेंढी याज- काकडे आणा.- आणि वल्हांडण सणानंतर पन्नासाव्या दिवसी सात सप्तकांचा सण पाळा. त्या समयीं पहिल्या उत्पन्नांतील पिकाच्या भाकरी परमेश्वराजवळ आणा *). आणि देशांतील सर्व उत्पन्नाचा संग्रह केल्यावर सातवा महिना (तिशरी) याच्या पंधराव्या दिवसापासून सात दिवसपर्यंत मंडपाचा सण पाळा. सात दिवस मंडपामध्ये राहा, कारण की, म्या इस्राएलाची संताने मिसर देशांतून काढली, तेव्हां ती (रानांतून प्रवास करीत असतां) मंडपांत राहत, असे म्या केले; हे तुमच्या पिढ्यां- तील लोकांनी जाणावे. _*) सीना डोंगरावरून देवाने आज्ञा दिल्या ही गोष्ट मिसर देशांतून निघाल्यापासून पन्नासाव्या दिवसों घडली यास्तव सप्तकांच्या सणांत दाहा आज्ञा दिल्याची अठवण इस्राएल लोक करीत असत. ३. आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले की: "सातव्या महिन्यांती- ल शुद्ध दशमीचा दिवस तुह्मास प्रायश्चित्त करण्याचा दिवस आहे. यास्तव त्यांत तुमचा देव परमेश्वर यासमोर तुह्मास प्रायश्चित्त केलें पाहिजे. तेव्हां तुह्मी दुःख प्रदर्शित उपास करा. त्या दिवसी जो कोणी माणस काम करील आणि दु:खं प्रदर्शित उपास करणार नाहीं तो आपल्या लोकांतन छेदला जाईल. त्या दिवसी केवळ अहरोन (मुख्ययाजक)याने परम- पवित्रस्थानांत जाऊन कोशावरील दयासनासमोर उभे राहावे. पाण्याने आपले अंग धुऊन व पवित्र वस्त्र लेऊन त्याने प्रथम आपणाविषयीं व आपल्या घराण्याविषयी पापार्पण करून प्रायश्चित्त करावे. मग त्याने दोन बोकड घेऊन परमेश्वरापुढे आणावे, आणि त्या दोन बोकडांवर पण पाडावे. एक परमेश्वरासाठीव एक अजाजेलासाठी*). मग ज्या बोकडावर परमेश्वरासाठी निघेल तो लोकांच्या पापार्पणासाठी कापावा आणि त्याचे रक्त परम- पवित्रस्थानांत नेऊन दयासनावर शिंपडावे. याप्रमाणे अहरोनाने इसा- एलाच्या सर्व मंडळीविषयी प्रायश्चित्त करावे, त्यानंतर त्याने जिवंत