पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्राएलांच्या सणाचे समय. प्रक०४० प्रक० ४०. इस्राएलांच्या सणाचे समय, (निर्ग०३१, १३-१५; लेवी०१६.२३. २५; अनु०१६.) आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले की: "माझे शाब्बाथ अगत्य पाळा, कारण तुमच्या पिढ्यानपिढी माझ्या व तुमच्या मध्ये ती खूण आहे. यास्तव जो कोणी त्यांत काम करतो तो माणूस आपल्या लोकांमधून छेदला जाईल. सातवा महिना (तिशरी ह्मणजे सप्टेंबर ) याच्या प्रतिपदेस करणा वाजविण्याचा सण आहे. त्यांत तुह्मी करणे वाजवावे, संसाराचे काम कांहीं करूं नये. कारण तो मोठा शाब्बाथ दिवस आहे (इस्राएल लो- कांच्या व्यावहारिक वर्षाचा हा प्रथम दिवस).- आणि जो देश मी तुह्मास देतो त्यांत तुह्मी जाल, तेव्हां देशाला विसांवा असावा. सहा वर्षे आपले शेत पेरा व त्याचे उत्पन्न गोळा करा. परंतु सातवें वर्ष (शाब्बाथरूप वर्ष) त्यांत आपले शेत पेरूं नका, आणि जे सहज पिकेल ते काही नका. ते तुमच्या लोकांतील दरिद्री खातील आणि त्यांपासून जे उरेल ते रानांतील पशु खाईल. आणि याच वर्षांतील मंडपाच्या सणांत जे ठिकाण परमेश्वर नि- वडून घेईल तेथे नियमशास्त्र सर्वांसमोर, ह्मणजे पुरुष, बायका, लेकरें व विदेशी यांच्या मंडळींत वाचून दाखीव, यासाठी की, त्यांनी ऐकून सर्व गोष्टी पाळायास शिकाव्या.-आणि शाब्बाथरूप सात वर्षे झणजे सात सप्त. कवर्षे मोज,आणि सातव्या महिन्याच्या शुद्ध दशमीस (प्रायश्चित्त करण्या- च्या दिवसी) तूं नादाचा करणा चहुंकडे वाजीव, आणि पन्नासावे वर्ष पवित्र करा. ते तुह्मास योवेल वर्ष (आनंदाचे वर्ष ) व्हावे. त्यांत पेरूं नका व कापूंही नका. कदाचित् तुह्मी ह्मणाल, आमी सातव्या वर्षी (४९ व्या वर्षी) काय खावे! तर पाहा, मी सहाव्या वर्षी तुह्मास आशीर्वाद देईन व ते तीन वर्षांपुरते उत्पन्न देईल. तुह्मी नव्या वर्षांतील उत्पन्न येण्यापर्यंत जुने खाल. योबेल वर्षांत तुझी सर्वांनी आपापल्या वतनावर परत जावे, आणि तुह्मी आपल्या शेजाऱ्याला वतनाचे काही विकत देतां तर पुढील योबेल वर्षापर्यंत बहुत किंवा कमी वर्षे असतील त्या मानाने एखाद्याचे मोल वाढवा किंवा कमी करा. कारण उत्पन्नाच्या गणतीप्रमाणे तुह्मी विकत घ्यावे किंवा द्यावे. २. आणि परमेश्वराने मोश्याला सांगितले की: "जें ठिकाण परमे- श्वर निवडून घेईल तेथे वर्षांत तीन वेळा तुझ्या सर्व पुरुषांनी परमेश्वर