पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३ प्रक० ३९ याजकवर्ग, आशीर्वाद देवो आणि तुझे रक्षण करो! परमेश्वर आपल्या दृष्टीचा प्रकाश तुजवर पाडो आणि तुजवर कृपा करो! परमेश्वर आपली दृष्टि तुजवर लावो आणि तुला शांति देवो! तसे यांनी माझे नांव इस्राएलाच्या संतानांस लावावे ह्मणजे मी त्यांस आशीर्वाद देईन" गण ६, २३-२७. सूचना. जसा बीजामध्ये अंकुर गुप्त असतो तसे ह्या आशीर्वादवचनामध्ये देवपणांतील जे व्यक्तित्रैकल ते आणि त्याजकडून जे तारण आहे त्याचे गुजही आहे. तीन वेळ परमेश्वराचे नांव मंडळीवर ठेवण्यांत येते, कारण देव जो बाप त्याने तारण योजिलें, देव जो पुत्र तो तारण सिद्ध करितो, आणि देव जो पवित्र आत्मा तो तारण मनुष्यास प्राप्त करून देतो.-अणखी प्रथम केवळ परमेश्वर, आणि मागाहून दोनदां परमे- श्वराची दृष्टि, असे हटले आहे; त्याचे कारण, परमेश्वर जो बाप "तो अगम्य उजेडांत राहतो, त्याला कोणी माणसाने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवतही नाही" (२ तीम० ६,१६). मनुष्याच्या दर्पणरूप मखावरून त्याचे अंतर्याम जाणण्यांत येते. तसेच पुत्र व पवित्र आत्मा यांकडून बापाची आह्मास ओळख होती.-अणखी या आशीर्वाद- वचनाच्या पहिल्या भागांत आशीर्वाद देणे व रक्षण करणे याविषयीं विनंती आहे, हे बापाकडे आहे, कारण की तो सर्व आशीर्वाद, सुख व जीवन याचा उगम आहे. "प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान त्यापासून उतरते"(याक ०१,२७). दुसऱ्या भागांत उजेड व कृपा याविषयी विनंती आहे, हे पुत्राकडे आहे. कारण कीं"जो प्रत्येक माणसाला प्रकाश- तो तोच खरा प्रकाश आहे" (योह०१,९), आणि "त्याच्या पूर्णपणांतून आह्मा सर्वांस मिळाले आणि कृपेवर कृपा" (योह० १,१६). तिसऱ्या भागांत शांतिविषयी मागणे आहे हे पवित्र आत्म्याकडे आहे; कारण कीजैतारण येशू ख्रीस्ताने सिद्ध केले,तेआह्मास पवित्र आत्म्याच्या योगाने, प्राप्त होते, खीस्ताच्या पूर्णपणाकडून पापाची क्षमा करून तो सर्वकाळ- च्या जीवनाची आशा आह्मास लावितो, आणि तेणेकरून आमच्या अंतःकरणाच्या ठायीं जी खरी शांति ती उत्पन्न होती.