पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याजकवर्ग. [प्रक० ३९ पवित्र देशांत लेवी वंशाला वतन मिळायाचे नव्हते, कारण परमेश्वरच त्यांचा वाटा होता. याकरितां याजक व लेवी यांचा निर्वाह होण्यासाठी सर्व वंशांनी आपल्या पशूतील प्रथम वत्स आणि आपल्या सर्व मिळकतीचा दाहावा भाग पवित्र स्थानांत आणावा असा नेम केला होता. पवित्र देशां- तून लेवी वंशासाठी वस्ति होण्याकरितां ४८ नगरे नेमली होती. अहरोन मुख्य याजक असून सर्व लेवी वंशाचा अध्यक्ष होता, आणि त्याची पदवी नेहमी त्याच्या वडील पुत्रास प्राप्त व्हायाची होती. याजकाचा पदवीचा पोशाक बारीक तागाचा पांढरा अंगरखा, कंबरेस काच्या आणि डोक्यास फैटा असा होता. अंगरख्या शिवाय मुख्ययाजकाला आणखी झगा होता व छातीवर उरपट त्यावर सोन्याने कोंदलेले १२ उंच पाषाण होते; आणि त्या पाषाणांवर अहरोनाने इस्राएलाच्या संतानांची नावे अखंड परमेश्वरासमोर अठवावी, ह्मणून बारा वंशांची नांवे कोरलेली होती. उरपटांत उरीम व थुम्मीम (उजेड व सत्यता) हीं होती, आणि तेणेकरून अहरोनाला देवाचे वचन प्राप्त होऊन त्याने अनेक गोष्टींचा निकाल केला, परंतु त्या निकालाविषयीं वर्णन करण्यास त्याचा शोध आह्मास लागत नाही. मुख्ययाजकाच्या फेट्यावर सोन्याचा पत्रा करून त्यावर "परमेश्वरासाठी पवित्र” असे कोरिले होते. २. सभामंडप उभारल्यावर अहरोन व त्याचे पुत्र यांस याजकाच्या कामाची दीक्षा मिळाली. मोश्याने त्यांस पाण्याने धूतले, मग त्यांचा पोशाक त्यांस घातला आणि तेलाने त्यांस अभिषिक्त केले. त्यानंतर अहरोना- ने होमवेदीजवळ येऊन प्रथम आपणासाठी आणि मग लोकांसाठी यज्ञ केले, आणि मोश्याने त्या यज्ञांतील रक्त घेऊन अहरोन व त्याचे पुत्र यांच्या कानावर, हातावर आणि पायावर शिंपडले. तेव्हां परमेश्वराचे तेज सर्व लोकांसमोर प्रगट होऊन परमेश्वरापुढून अमि निघाला आणि त्याकडून वेदीवरील होमाचे मांस जळाले. परंतु अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहु यांनी आपली धूपाटणे घेऊन जो अग्नि सांगितला नव्हता तो त्यांमध्ये घातला आणि त्यांवर धूप ठेवून तो परमेश्वरासमोर आणला. तेव्हां परमेश्वरापुढून अग्नि निघून त्याने त्यांस भस्म केले. -आणि परमेश्व- राने सांगितले की, अहरोनाला व त्याच्या पुत्राला असे सांग ; तुह्मी इस्रा- एलाच्या संतानास आशीर्वाद देतां तेव्हां त्यांस असे ह्मणाः “परमेश्वर तुला