पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ प्रक० ३९] याजकवर्ग. साठी ते (यज्ञपशूचे रक्त) प्रायश्चित्त करायास म्या तुह्मास वेदीवर दिले आहे, कांतर जिवासाठी प्रायश्चित्त जै करिते ते रक्त आहे" (लेवीय १७,११). तथापि प्रायश्चित्त करण्याचे हे सामर्थ्य स्वतः पशुयज्ञामध्ये होते असे नाही. खीस्लाने देवाच्या कृपायुक्त योजनेप्रमाणे सर्व जगांतील पापांसाठी काळाच्या पूर्णतेस आपणाला सनातनकाळापर्यंत टिकणारे व योग्य अर्पण करावे असे होते, यास्तव पशुयज्ञ करणे हे खीस्ताच्या यज्ञाचे प्रतिरूप व छाया असल्यामुळे पशुयज्ञामध्ये तो गुण होता. २. आणि परमेश्वराने चार प्रकारचे यज्ञ नेमून दिले. मनुष्य न जाणतां चकन परमेश्वराच्या आज्ञेपैकी एखादी मोडून पाप करतो. तर याने जे परमेश्वराविरुद्ध पाप केले ते त्याजला समजल्यावर त्या पापाच्या प्रायश्चित्तासाठी प्रथम पापार्पण किंवा दोषार्पण आणावे. तेणेकरून तो फिरून देवाच्या पवित्र लोकांच्या संगतीतला होतो, कारण आपल्या पापा- मळे तो बहिष्कृत झाला होता. त्यानंतर त्याने होमार्पण आणावे, आणि ते सर्वांशी जाळावे. मग ज्याचे केवळ सर्व मांद जाळावयाचे व ज्याच्या मांसाचे यज्ञभोजन करावयाचे असे शांत्यर्पण त्यांनी आणावे. होमार्पण व शांत्यर्पण एखाद्या विशेष पापाच्या प्रायश्चित्तासाठीच आहेत असे नाहीं तर जी साधारण पापी अवस्था सर्वदा मनुष्यास जडून आहे तिच्या प्राय- श्चित्तासाठी ती होती, यास्तव विशेष पाप नसतांही ती अर्पण करण्याची मोकळीक असे. प्रक० २९. याजकवर्ग. (निर्ग०२८ व २९. लेवी०८-१०. गण० ८.) २. आणि परमेश्वराने इस्राएलाच्या सर्व वंशांतील प्रथम जन्मलेले पुत्र यांच्या बद्दल पवित्रस्थानांत सेवा करण्यासाठी सर्व लेवी वंश निवडून घेतला. तथापि प्रत्येक प्रथम पुत्र पवित्रस्थानाजवळ आणून खंडन ध्यायाचा होता.- याजकपणाच्या कामासाठी अहरोनाचे घराणे नेमलें होते. वरकड सर्व लेवी (मोश्याचे पुत्र सुद्धा) याजकांच्या हाताखाली सभामंडपासंबंधी सेवा करणारे होते आणि याशिवाय त्यांनी सर्व लोकांस नियमशास्त्राचा अर्थ सांगून बोध करावा हेही त्यांजकडे सोपले होते