पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यज्ञ करणे. प्रक० ३८ जर रक्तमय अर्पण आणायाची कोणाची इच्छा असेल, तर त्याने गुरां- तील, मेंढरांतील अथवा शेळ्यांतील एक तरुण, तयार व निर्दोष पशु घेऊन मंडपाच्या अंगणांत आणावा, आणि त्याने आपला हात त्या पशूच्या डोक्यावर ठेवून तो होमवेदीसमोर कापावा. मग याजकांनी त्याचे रक्त घेऊन वेदीवर शिंपडावे. नंतर पाहिजे तर पशूचे सर्व मांस अथवा यांतील काही भाग होमवेदीवर जाळावा आणि त्याबरोबर अन्नार्पणही जाळावे. अन्नार्पणाचे साहित्य तर भाकर, द्राक्षरस, तेल व धूप हे असावे. आणि जे मांस जाळण्यांत येणार नाही त्याचे यज्ञभोजन करावे. सूचना १. मनुष्य पापाच्या योगाने मरणाधीन झाला. कारण की मरण पापाचे फळ आहे (रोम० ६,२३.) यज्ञपशूच्या डोक्यावर यज्ञ- कर्ता याने आपला हात ठेवण्याकडून तो पशु आपला प्रतिनिधि करून जणू आपले पाप त्यावर सोपितो. तसेच यज्ञपशु पाप्याचा बदला होऊन त्याजला योग्य जे मरण ते सोसतो. याजक ओतलेले रक्त घेऊन वेदीवर शिंपडतो असे करून तो ते रक्त देवाजवळ आणून दाखवून विनंती करतो की, कपाकरून देवाने ह्या बदल्याचे शिक्षा सोसणे कबूल करून पाप्याची पापापासून मुक्तता करावी व त्यास न्यायी ठरवावे. देवासी समेट पावलेला माणूस देवाप्रीत्यर्थ सर्वांग अमिरूप पवित्रतेने शुद्ध होऊन आपणाला सुवासिक अर्पणासाठी देवा- ला देतो, असे यज्ञाचे मांस जाळण्यावरून समजावयाचे आहे. जे अन्नार्पण जाळायाचे ते असे दर्शविते की, पवित्र होणे हे केवळ पवित्र आत्मा (तेल) याच्या साह्याने, आणिअखंडित प्रार्थना (धूप) याच्या योगाने झाले पाहिजे. आणि सद्भक्तीची फले (भाकर आणि द्राक्ष- रस) आपल्या आचरणाकडून दाखविली पाहिजेत.यज्ञभोजन (प्रक०३५ कलम २ यावरील टीका पाहा) याकडून न्यायी ठरण्याने व पवित्र होण्याने सद्भक्ताचा देवासी व देवाचा त्यासी स्नेहभाव सूचविला जातो. सूचना २. "बैलाचे व मेंढ्याचे रक्त पापे दूर करायास शक्तिमान नाहीं (इब्री १०,४ ). कारण कोणतीही हलकी वस्तू भारी वस्तूस खंडून घेऊ शकत नाही. निर्दोषी यज्ञपशु याचा प्राण स्वतंत्रतेचा नसून दोषी मनुष्याच्या प्राणासारखा मोलवानही नाही. तथापि देवाने असे वचन दिले आहे की: "देहाचे जीवन रक्तामध्ये आहे आणि तुमच्या जिवा-