पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८९ प्रक० ३८] यज्ञ करणे. आहे त्या दयासनाने कोश झांकलेला असल्यामुळे त्या पायांचे साक्ष देणे खुंटले जाऊनलोकांच्या अपराधांची क्षमा झाली आहे असे दाखविले आहे. यास्तव कोशावरून जो बोध घ्यावयाचा तो हाच की, पाप झांकणे ह्मणजे पापाची क्षमा करणे यहोवाकडे असून या कामास तो उत्सुक- ही आहे.-करूबांच्या आकृत्या दयासनाकडे तोड करून भजन करतात. याचा अर्थ हा की खीस्ताचै रक्त ओतले गेल्याने पापाचें प्रायश्चित्त खरोखर झाले आहे, याविषयी न्याहळून पाहवे असी दूतांची फार इच्छा आहे (१ पेतर० १,१२ पाहा). अंगणांतील हो- मवेदीवर अपराधी लोकांनी यज्ञ करण्याकडून आपले पाप अंगीकारावे, त्याची क्षमा मागावी आणि त्याप्रमाणे त्यांस क्षमाही प्राप्त व्हावी हे दाखविले आहे. मंडप, परमपवित्रस्थानांतील कोश व अंगणांतील होमवेदी यांचे जसे लाक्षणिक अर्थ आहेत तसेच पवित्रस्थानांतील दिव्याचे झाड, धूपवेदी व मेज तीही लाक्षणिक आहेत. दिव्याचे झाड असे दाखविते की, देवासी समेट पावलेले लोक उजेडाचे पुत्र आहेत. ते प्रार्थनेत तत्पर आहेत हे धूपवेदी दर्शविती आणि मेजावर ठेविलेल्या भाकरीवरून दिसून यावे की, ते चांगली कामे करण्यास उत्सुक आहेत. ४. मंडप व त्यांतील सर्व पाने इस्राएललोक मिसर देशांतून निघाल्या नंतर दुसऱ्या वर्षांतील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवसीं तयार होऊन छावणीच्या मध्य भागी मंडप उभारला गेला. तेव्हां ढगाने सभामंडप झांकला व परमेश्वराचे तेज मंडपांत भरले. आणि जेव्हां ढग मंडपा- वरून चढे तेव्हां इस्राएलाची संताने प्रवासास निघत, परंत ढग चटन नव्हते, तेव्हां त्याच्या चढण्याच्या दिवसापर्यंत ते आपल्या ठिकाणावर राहत असत. प्रक०३८. यज्ञ करणे. (लवी० १-७.) १ अणखी परमेश्वराने मोश्याला हाक मारून इस्राएलाच्या संतानांनी आपल्या पांचे प्रायश्चित्त होण्यासाठी परमेश्वराला कोणत्या रीतीने यज्ञ करावा व अर्पण आणावे हे त्याला सभामंडपांतून आज्ञा देऊन सांगितले.- 12 H